जम्मू- नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहे. पाकिस्तानने शुक्रवारी रात्री उशीरा राजौरीमधील सुंदरबानी सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. यात एक भारतीय जवान शहीद तर एक जखमी झाला आहे. जयद्रथ सिंग असे शहीद जवानाचे नाव आहे.
पाकिस्तानी लष्कराने या महिन्यात तब्बल 18 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. त्यात नऊ भारतीय जवान शहीद झाले असून 18 जवान जखमी झाले आहेत. या वर्षात 11 जुलैपर्यंत 228 वेळा सीझफायर व्हॉयलेशन झाले.