आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ceasefire Violation By Pakistan One More Intruder Arrested

जम्मू-काश्‍मीर : पूलवामामध्‍ये मारला गेला ल‌ष्करचा दहशतवादी, गोळीबार सुरुच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद/श्रीनगर - दक्षिण काश्‍मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील काकापोडात भारतीय सेना आणि लष्कर-ए-तैयबा दरम्यान गुरुवारी (ता. सहा)झालेल्या गोळीबारात एक दहशतवादी मारला गेला आहे. सैन्याच्या सूत्रानुसार याच भागात दोन दहशतवादी लपले आहेत. सेनेला लष्करच्या दहशतवाद्यांची माहिती मिळाली होती. गुरुवारी सैन्याने दहशतवाद्यांच्या ठिकाणावर गोळीबार सुरु केला.
दहशतवादी असलेल्या भागाची नाकेबंदी केली होती. याचा सुगावा लागताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. अद्याप काकापोडात लष्‍करी कारवाई सुरु आहे.
छायाचित्र: गोळीबारात मारला गेलेला दहशतवादी.