आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ceasefire Violation Continue On International Border

चार रेंजर्सचा प्राण गमावल्यानंतरही रात्रभर पाकिस्तानचा सीमेवर तुफान गोळीबार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - पाकिस्तानकडून होणा-या फायरिंगमुळे सीमाभागात राहणारे लोक त्रस्त आहेत.

श्रीनगर - पाकिस्तानकडून वारंवार होणा-या शंस्त्रसंधीचे भारताकडून त्याच पद्धतीने प्रत्युत्तर दिले जात आहे. मात्र तरीही पाकिस्तानच्या वागणुकीत बदल होत नसल्याचे दिसत आहे. पाकिस्तानी लष्कराने जम्मू-काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर बुधवारी रात्री बीएसएफच्या 13 चौक्यांना लक्ष्य केले. सीमेला लागून असलेल्या सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून रात्री 12 पासून पहाटे 6 पर्यंत फायरिंग सुरू होती.

त्याआधी बुधवारीच पाकने वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते आणि भारतीय लष्करानेही त्याचे योग्य उत्तर दिले होते. त्यात पाकिस्तानच्या चार रेंजर्सचाही मृत्यू झाला होता. पाकिस्तानने जेव्हा मृतदेह उचलण्यासाठी पांढरे झेंडे दाखवले तेव्हा भारताने फायरिंग थांबवली होती. पण पाकिस्तानने भारतावरच शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचा आरोप लावला आणि भारताच्या उप उच्चायुक्तांकडे विरोध दर्शवला.

या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, पाकिस्तानला शस्त्रसंधीचे उल्लंघन सोडावेच लागेल. राजनाथ यांच्या मते, पाकिस्तान आज नाही तर उद्या ठिकाणावर येईलच. दरम्यान, सीमेला लागून असलेल्या गावातील लोकही पाकिस्तानकडून होणा-या फायरिंगने त्रस्त झाले आहेत. दरम्यान, बुधवारी पाकिस्तानने केलेल्या फायरिंगमध्ये ठार झालेल्या बीएसएफ जवानाला अधिका-यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
पुढील स्लाईड्सवर बघा, या घटनेशी निगडित फोटो.....