आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा देऊनही पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, BSF च्या 40 चौक्यांवर केली रात्री फायरिंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : अंत्यंसंस्कारासाठी उपस्थित असलेले जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला.
जम्मू - सोमवारी भारताने कडक इशारा देऊनही मंगळवारी पाकिस्तानकडून गोळीबार सुरुच होता. रात्री पाकिस्तानने BSF च्या 40 चौक्यांवर गोळीबार केला. दरम्यान रविवारी झालेल्या फायरिंगमध्ये ठार झालेल्या मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचीही उपस्थिती होती.

पाकिस्तानकडून अखनूर, अरनिया आणि आपएसपुरा मधील बीएसएफच्या 40 चौक्यांवर रात्रभर गोळीबार करण्यात करण्यात त्यात तीन जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी बीएसएफ केंद्र सरकारला अहवाल सादर करणार आहे. त्यापूर्वी रविवारी झालेल्या फायरिंगमध्ये पाच जण ठार झाले होते. मृतांच्या संख्येचा विचार करता गेल्या 11 वर्षांतील ही सर्वात मोठी घटना आहे. पाकिस्तानने रविवारी रात्री मुद्दाम रहिवासी भागांना लक्ष्य केल्याचे म्हटले आहे. या लोकांचे मृत्यू क्रास फायरिंगमध्ये नाही झाला. तर योजनाबद्ध पद्धतीने हा गोळीबार करण्यात आला होता, असे बीएसएफच्या अधिका-यांचे म्हणणे आहे. ज्या गावांत गोळीबार झाला ती गावे बीएसएफच्या चौक्यांपासून ब-याच अंतरावर आहे. आंतरराष्ट्रीय सीमेपासूनही ही गावे सुमारे चार किलोमीटर दूर आहेत. त्यामुळे ही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

ईदच्या दिवशी संध्याकाळीही गोळीबार
बीएसएफच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून ईदच्या दिवशी सायंकाळी सहा वाजता सुमारे वीस मिनिटे फायरिंग सुरू होती. त्याला भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले.

पाकिस्तानने मिठाई नाकारली
कारगिल युद्धानंतर पहिल्यांदाच सोमवारी ईदच्या दिवशी वाघा बॉर्डरवर भारत आणि पाकिस्तानची दारं बंद होती. तसेच दोन्ही बाजुंनी एकमेकांना मिठाईही देण्यात आली नाही. आतापर्यंत दोन्ही देशांचे लष्कराचे मोठे अधिकारी वाघा बॉर्डरवर भेटून पारंपरिक पद्धतीने एकमेकांनी मिठाईची देवाण घेवाण करायचे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, गोळीबारानंतरचे PHOTO