आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ceasefire Violation In RS Pura Sector For The Last 20 Hours,11 Civilians Injured

जम्मू-काश्मीरमध्ये २३ तासांपासून क्रॉस बॉर्डर फायरिंग, ११ जखमी, ३ PAK सैनिक ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानच्या फायरिंगमध्ये एक मुलगीही जखमी झाली आहे. - Divya Marathi
पाकिस्तानच्या फायरिंगमध्ये एक मुलगीही जखमी झाली आहे.
जम्मू - पाकिस्तानकडून शस्त्रसंधींचे वारंवार उल्लंघन होत आहे. नौशेरा आणि आरएस पुरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून सलग २३ तासांपासून फायरिंग सुरु आहे. यात आतापर्यंत ११ जण जखमी झाले आहेत. त्यात एका मुलीसह ६ महिलांचा समावेश आहे. एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या गावांतील अनेक घरांचे मोठे नुकसान झाले आहे. आर्मी आणि बीएसएफने दिलेल्या प्रत्युत्तरात तीन पाकिस्तानी सैनिक ठार झाले.
सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तानकडून ४० वेळे शस्त्रसंधीचे उल्लंघन
- पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तानने आतापर्यंत ४० वेळा शस्त्रसंधींचे उल्लंघन केले आहे.
- संरक्षण मंत्रालयातील सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानी रेंजर्सने मंगळवारी सकाळी १० वाजता नौशेरा सेक्टरमधील कलाल आणि बाबा खोरी भागात अनेक राऊंड फायर केले.
- आरएस पुरा येथील सुचेतगड येथे दीड तास गोळीबार सुरु होता. सीमेपलिकडून अनेक मोर्टर फायर केले गेले.
- यात अब्दुलयान आणि चंदू गावातील सात महिला जखमी झाल्या. बीएसएफने पाकिस्तानच्या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिले.
- सोमवारी सीमेपलिकडून झालेल्या फायरिंगमध्ये एक जवान शहीद झाला होता. त्यासोबतच एका मुलाचाही मृत्यू झाला.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...