आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Celebrate Diversity, Don't Discriminate On Religion, Says RSS Chief Mohan Bhagwat

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धर्मावरून भेदभाव केला जाऊ नये : मोहन भागवत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
म्हैसुरू - धर्माच्या नावाखाली कोणत्याही प्रकारचा भेदभाव होता कामा नये. भाषा, वेशभूषा आणि परंपरांच्या आधारे कोणालाही वेगळे समजू नये, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी रविवारी म्हटले आहे.

रविवारी येथे आयोजित पाचव्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सरसंघचालक बोलत होते. ते म्हणाले, विविधतेचा आनंद घेता यायला हवा. त्याला विरोध व्हायला नको. आपल्याकडे वेगवेगळ्या पूजा पद्धती आहेत. खानपानाच्या सवयीदेखील भिन्नभिन्न आढळून येतात. सर्वांना सोबत घेऊन चालले पाहिजे. त्यासाठी तसा मार्ग काढायला हवा.