मोबाइलमध्ये दोन तासांचे रेकॉर्डिंगमेडिकल कॉलेजचे डिन डॉ. आर. के. बंसल म्हणाले, 'मुख्य ऑपरेशन थिएटरमध्ये दोन डॉक्टर्स ऑपरेशन करत होत्या. सायंकाळी सहा वाजता त्यातील एक डॉक्टर चेंजिंगरुममध्ये गेली. तिथे तिने पाहिले, की यूज स्क्रब्सच्या बास्केटमध्ये एका चादरीखाली काही आहे. त्या चादरीला एक होल असल्याने डॉक्टरचा संशय बळावला. तिने चेक केल्यानतंर तिथे एक बॅग सापडली. डॉक्टरला त्या बॅगमध्ये एक मोबाइल फोन लपवून ठेवलेला दिसला. तो मोबाइल व्हिडिओ रेकॉर्डिंग मोडवर होता आणि कॅमेरा ऑन होता. डॉक्टर्सने तत्काळ याची माहिती तिथे उपस्थित नर्स आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिली.' डॉ. बंसल म्हणाले, की जेव्हा मी तिथे पोहोचलो तोपर्यंत पोलिस आलेले होते. मोबाइलमध्ये चेंजिंग रुमचे दोन तासांचे रेकॉर्डिंग झालेले होते. मोबाइलची बॅटली लो असल्यामुळे व्हिडिओमध्ये काय आहे ते आम्ही पाहू शकलो नाही.
मोबाइल तपासासाठी पोलिस स्टेशनमध्ये
मोबाइल कॅमेऱ्याने व्हिडिओ बनवला जात असल्याचे चंदिगड जीएमसीएचच्या डॉक्टरांनी प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यानतंर त्याच रात्री नऊ वाजता गुन्हा नोंदवण्यात आला. मोबाइल फोन ओटीमध्ये काम करत असलेला सफाई कामगार निर्मल लालचा होता. पोलिसांनी निर्मलला अटक केली असून त्याच्यावर 354-सी, 511 अंतर्गत कलम 34 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी मोबाइल फोन सेंट्रल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्याची तयारी केली आहे.