आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MSG ला हिरवी झेंडी, गुडगावमध्ये प्रीमिअर, सेंसॉरच्या अध्यक्ष लीला सॅमसन यांचा राजीनामा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - लीला सॅमसन)
नवी दिल्ली - सेंसॉर बोर्डाच्या अध्यक्षा लीला सॅमसन यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम यांच्या MSG या वादग्रस्त चित्रपटाला परवानगी मिळाल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे. सेंसॉर बोर्डाने या चित्रपटाला परवानगी नाकारली होती. पण चित्रपट प्रणाणपत्र नामांकन लवादाने चित्रपटाला मंजुरी दिल्याने चित्रपट प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

चित्रपटातील काही दृश्यांचा आवाज म्यूट करून चित्रपट प्रदर्शनाला मंजुरी देण्यात आली आहे. पण सेंसॉर बोर्डाने परवानगी नाकारली असताना अशा चित्रपटाला लवादाकडून परवानगी मिळणे ही सेंसॉर बोर्डाची चेष्टा उडवल्याचा प्रकार अशल्याचे लीला सॅमसन म्हणाल्या आहेत. माहिती व प्रसारण खात्याच्या सचिवांकडे सॅमसन यांनी त्यांचा राजीनामा सादर केला आहे.

लीला सॅमसन यांनी राजीनाम्याचे नेमके ठोस कारण स्पष्ट केलेले नसले तरी, सेंसॉर बोर्डाच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप वाढला असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. तसेच सुमारे नऊ महिन्यांपासून मंत्रालयाकडून कोणत्याही प्रकारचा निधी मिळत नसल्याने बोर्डाला काम करणे अत्यंत कठीण जात असल्याचेही सॅमसन यांनी सांगितले आहे. तसेच मंत्रालयाकडून नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचारी आणि सदस्यांवरही त्यांनी नाराजी दर्शवल्याचे समोर आले आहे.

लीला सॅमसन यांच्यासह सर्व सदस्यांचा कार्यकाल संपलेला आहे. पण नव्या अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती करण्यात बोर्डाला अपयश आल्याने जुन्याच सर्व सदस्यांना काम करण्यास सांगण्यात आले होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, Photo आणि अखेरच्या स्लाइडवर पाहा चित्रपटाचे Trailor