आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एस. दुर्गाचे प्रदर्शन रोखण्याचे केंद्रीय प्रमाणन मंडळाचे आदेश; नाव ‘एस###’ केल्याने आक्षेप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पणजी- केरळ उच्च न्यायालयाच्या एकल पीठाने मंगळवारी गोव्यात सुरु असलेल्या ४८ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) मल्याळम चित्रपट ‘एस. दुर्गा’ चे प्रदर्शन करण्याचे आदेश दिले होते. मात्र केंद्रीय फिल्म प्रमाणन मंडळाने त्यानंतरही प्रदर्शन रोखण्याचे आदेश दिले आहेत. माहिती व जनसंपर्क मंत्रालयाने या चित्रपटाला महोत्सवातून हटवण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर दिग्दर्शक सनल कुमार शशीधरन यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर इफ्फीचे दिग्दर्शक सुनीत टंडन यांनी ‘एस. दुर्गा’ च्या प्रदर्शनाचा निर्णय घेतला होता. ७ पंच चित्रपट दाखवण्यात यावा या मताचे असून ४ पंच याविरुद्ध आहेत. पंचांनी सोमवारी रात्री या चित्रपटाची सेन्सॉर केलेली आवृत्ती पाहिली आहे.  


केंद्रीय फिल्म प्रमाणन मंडळाने (सीबीएफसी) आदेश दिले आहेत की, या चित्रपटाचे पुनर्परीक्षण करण्यात येईल. त्यामुळे केरळ उच्च न्यायालयाचा आदेश आता निष्प्रभ ठरला आहे. गोवा येथे सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाचे प्रदर्शन होणार नाही, असे आता स्पष्ट झाले आहे. सीबीएफसीने मंगळवारी चित्रपट निर्मात्याला पत्र लिहिले आहे. या चित्रपटाला पुन्हा परीक्षणासाठी पाठवावे असे यात लिहिले आहे. यापूर्वी चित्रपटाला ‘फक्त प्रौढांसाठी’ असे प्रमाणपत्र देण्यात आले होते.  


 चित्रपटाचे नाव एस. दुर्गा असून त्यातील ‘एस’ अक्षरावर सीबीएफसीचा आक्षेप आहे. यापूर्वी चित्रपटाला ‘सेक्सी दुर्गा’ असे नाव देण्यात आले होते. आता एस पुढे हॅशटॅग वापरले आहे. 

 

चित्रपटाचे नाव बदलणे मंडळाचा अवमान
केंद्रीय फिल्म प्रमाणन मंडळाने आदेश दिले की, चित्रपटाचे पुनर्परीक्षण पूर्ण झाल्याशिवाय चित्रपटाचे प्रदर्शन होणार नाही. पूर्वी सेक्सी दुर्गा नाव होते. ते बदलून ‘एस###  दुर्गा’ केले. नोंदणी करणाऱ्या व्यवस्थेचा अवमान निर्मात्याने केला आहे. या पत्रानंतर इफ्फीचे दिग्दर्शक सुनीत टंडन यांनी चित्रपट दिग्दर्शक शशीधरन यांना चित्रपट दाखवला जाणार नसल्याचे कळवले आहे.

बातम्या आणखी आहेत...