आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Central Burau Of Investigation File Chargesheet In The Case Of Nandigram

नंदीग्राम गोळीबार प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने दाखल केले आरोप पत्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - 2007 च्या नंदीग्राम गोळीबार प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आरोपपत्र दाखल केले आहे. मात्र, सरकारने पाच पोलिस अधिका-यांविरुद्ध खटला दाखल करण्याबाबत अद्याप निर्णय घेतला नाही. नंदीग्राम गोळीबारात 14 ग्रामस्थांचा मृत्यू झाला होता.
सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रात राज्य पोलिसांच्या पाच अधिका-यांविरुद्ध कोणताही आरोप ठेवण्यात आला नाही. सीबीआयने अलीकडेच दोन आरोपपत्रे दाखल केली आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांच्याकडे गृह मंत्रालयही होते. त्यांच्याविरुद्ध कुठलाही सबळ पुरावा सापडला नसल्यामुळे त्यांची चौकशी करण्यात आली नसल्याचे सीबीआय सूत्रांनी सांगितले. एका आरोपपत्रात 132 खासगी व्यक्तींची नावे आहेत. पोलिस उपनिरीक्षक शंभू दास, अमित हाती आणि डॉ.लक्ष्मीकांत घोष या राज्य सरकारच्या तीन अधिका-यांविरुद्धच्या खटल्याला मंजुरी मिळाली नाही. अन्य एका आरोपपत्रात सीबीआयने 37 खासगी व्यक्तींचा आरोपपत्रात उल्लेख केला आहे.
अतिरिक्त पोलिस अधीक्षक देबाशिस बोराळ आणि सत्यजित बंदोपाध्याय आणि नंदीग्रामचे उपनिरीक्षक शेखर रॉय यांच्याविरुद्धच्या खटल्यास सरकारची अद्याप मंजुरी नाही. संबंधित अधिका-यांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्याबाबत सरकारने कुठलीही शिफारस केली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. सीबीआयने पोलिस महानिरीक्षक अरुण गुप्ता आणि तत्कालीन पोलिस अधीक्षक जी. अनिल श्रीनिवास यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे. आरोपीविरुद्ध दंगल पसरवणे आणि बेकायदा जमा होण्याचा गुन्हा दाखल केला आहे. सरकारी अधिका-यांविरुद्धच्या खटल्यास मंजुरी न मिळाल्यामुळे आरोपपत्रात त्यांचा उल्लेख करण्यात आला नसल्याचे सीबीआय सूत्रांनी सांगितले.