आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Central Government DA News In Marathi, Deparptment Of Personal And Training

केंद्रीय कर्मचा-यांच्या डीएवरील भत्त्यांत 25 टक्क्यांची वाढ!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिलासपूर - केंद्रीय कर्मचा-यांना महागाई भत्त्यांवर (डीए) मिळणा-या सर्वच भत्त्यांत 25 टक्क्यांची वाढ झाली आहे. केंद्र सरकार व केंद्रीय आस्थापनांत काम करणा-या लाखो कर्मचा-यांना 1 एप्रिल 2014 पासून याचा फायदा मिळेल. डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंगने (डीओपीटी) 28 एप्रिलला याचे आदेश जारी केले आहेत.

केंद्रीय कर्मचा-यांचा डीए 50% पेक्षा जास्त झाल्यास त्यांच्या सर्व भत्त्यांत 25% वाढीची शिफारस सहाव्या वेतन आयोगाने केली होती. त्यानुसार जून 2011 मध्ये 25% वाढ झाली होती. त्यानंतर डीए 100 टक्क्यांवर पोहोचला आहे. यामुळे पुन्हा 25 टक्क्यांची वाढ झाली.

असा होईल फायदा
० एका मुलासाठी शैक्षणिक भत्ता 15 हजारांवरून वार्षिक 18 हजार रुपये. प्रत्येक तिमाहीत 4,500 रुपये मिळणार.
० हॉस्टेलमध्ये शिकणा-या पाल्यासाठी दरमहा सबसिडी 3,750 वरून 4,500 रुपये.
० अपंग मुलाच्या देखभालीसाठी दरमहा भत्ता 1,250 वरून 1500 रुपये.

या भत्त्यांतही वाढ
डेली अलाउन्स, रोड मायलेज कार/टॅक्सी/ऑटो/स्कूटर, बदली झाल्यास शिफ्टिंग चार्ज, निर्धारित कन्व्हेंस, सायकल मेंटेनन्स, वॉशिंग अलाउन्स, आदिवासी/डोंगराळ/दुर्गम/वाईट हवामान असलेल्या भागात राहण्याचा भत्ता.