आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Central Government Declared Shaurya Chakra To Santosh Mahadik

साताऱ्याचे सुपुत्र शहीद कर्नल संतोष महाडिक यांना मरणोत्तर शौर्य चक्र बहाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- साताऱ्याचे वीरपुत्र कर्नल संतोष महाडिक यांना मरणोत्तर शाैर्यचक्र सन्मान जाहीर झाला आहे. जम्मू-काश्मिरात गेल्या १७ नोव्हेंबर रोजी कुपवाडा जिल्ह्यात अतिरेक्यांविरुद्धच्या चकमकीत ते शहीद झाले होते. केंद्र सरकारने सोमवारी शौर्य पुरस्कारांची घोषणा केली. यात एक अशोक चक्र, दोन कीर्ती चक्र आणि आठ शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आले.

लान्सनायक मोहननाथ गोस्वामी यांना मरणोत्तर अशोकचक्र, सुभेदार मोहनसिंह व शिपाई जगदीश चांद (मरणोत्तर) यांना कीर्ती चक्र सन्मान मिळेल. मेजर अनुरागकुमार, नाईक सतीशकुमार (मरणोत्तर), शिपाई धर्माराम यांना (मरणोत्तर) शौर्य पुरस्कार जाहीर झाला.

कर्नल महाडिकांच्या नेतृत्वात अशी उघडण्यात आली होती धाडसी मोहिम
कुपवाडामधील हाजीनाका जंगलात असलेल्या डोंगराळ भागात काही दहशतवादी दबा धरुन बसले होते. त्यांच्याजवळ मोठा शस्त्रसाठा आणि जिवनावश्यक वस्तू होत्या. काश्मिरसह देशात काही तरी मोठा घातपात करण्याचा त्यांनी कट रचला होता. काही दिवसांपूर्वी याच दहशतवाद्यांनी लष्कराच्या एका तुकडीवर हल्ला केला होता. तेव्हापासून हे दहशतवादी लष्कराला चुकवीत होते.

या दहशतवाद्यांना शोधण्याची मोहिम 41 राष्ट्रीय रायफल्सला सोपविण्यात आली होती. कर्नल महाडिक हे ४१ राष्ट्रीय रायफल रेजिमेंटमध्ये कमांडिंग ऑफिसर म्हणून कार्यरत होते. हाजीनाका जंगलातील डोंगराळ भागात अतिशय बिकट परिस्थिती आहे. दाट जंगल, उभे पर्वत, खोल दऱ्या आणि प्रचंड थंडी. दीड दिवसांच्या शोध मोहिमेनंतर महाडिक यांच्या टीमला दहशतवाद्यांचा ठावठिकाणा लागला. त्यांनी दहशतवाद्यांवर जोरदार प्रहार केला. दोन्ही बाजूंनी तुफान गोळीबार सुरु झाला. यात महाडिक यांनी दहशतवाद्यांना जेरीस आणले. आता दहशतवाद्यांचा खातमा अगदी निश्चित होता. पण एक गोळी महाडिक यांच्या डोक्याला लागली. यात ते जबर जखमी झाले. त्यानंतर त्यांना हेलिकॉप्टरने एअरलिफ्ट करण्यात आले. लष्कराच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. पण अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

धोनीलाही शिकवले पॅराग्लायडिंग
पोगरवाडीतील महाडिक कुटुंबीयांचा पारंपारिक दूध विक्रीचा व्यवसाय होता. पण त्यात संतोष यांचे कधी मन रमले नाही. काही तरी वेगळे करण्याची उर्मी त्यांना स्वस्थ बसवत नसे. संतोष उत्तम गोलकिपर होते. त्यांना बॉक्सिंग, ट्रेकिंग आणि घोडेस्वारी आवडायची. त्यांनी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याला ऑगस्ट महिन्यात पॅराग्लायडिंग शिकवले होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, महाडिक यांचे PHOTOS