आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महत्त्वाच्या ठिकाणांच्या ‘गुगल व्ह्यू’ सेवेला केंद्र सरकारचा नकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशातील शहरे, पर्यटनस्थळ, डोंगर-नदी, रस्ते यांच्याबद्दलच्या गुगल व्ह्यू सेवेला केंद्राने परवानगी देण्यास नकार दिला आहे. आपल्या सेवेद्वारे शहरे-रस्त्यांचा ऑनलाइन सविस्तर तपशील उपलब्ध करून देण्यात येईल, असे गुगलकडून सांगण्यात आले होते.
अशा प्रकारच्या सेवेमुळे लहानातील लहान रस्त्यापासून डोंगरापर्यंतचा तपशील अगदी ३६० अंशाच्या कोनातून मिळवणे शक्य होते.
दहशतवादी हल्ल्याचा विचार करून केंद्राने परवानगी देण्यास नकार दिला. २००८ मध्ये मुंबईत दहशतवादी हल्ला झाला होता. अनेक दहशतवादी हल्ल्यांच्या कटात छायाचित्र घेऊन रेकी करण्यात आल्याचे पुरावे सापडले होते. गुगलच्या प्रस्तावानंतर सरकारने गुप्तचर यंत्रणेचा सल्ला मागवला. त्याचा अहवाल आला अाहे. गुगल व्ह्यू सेवेला परवानगी देणे म्हणजे देशाच्या सुरक्षेचा धोका पत्करण्यासारखे होईल, असे निरीक्षण अहवालातून मांडण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी िदली.देशातील बहुतेक महत्वाचे प्रदेश गूगल व्ह्यमध्ये समाविष्ट करण्याची विनंती कंपनीकडून करण्यात आली आहे. अमेरिका, कॅनडासह अनेक युरोपियन देशात ही सुविधा वापरली जाते. भारतातही काही ठिकाणांची माहिती ३६० अंशाच्या काेनातून तपशीलवारपणे पाहता येते. परंतु सरकारने सरसकट शहर किंवा पर्यटनस्थळांची माहितीचा अधिकारी नाकारला आहे.

प्रायोगिक तत्वावर : ताज महाल, लाल किल्ला, कुतूब मिनार, वाराणसी नदी, नालंदा विद्यापीठ, म्हैसूर महल, तांजावूर मंदिर, चिन्मयस्वामी मैदान यासह काही निवडक ठिकाणे प्रायोगिक तत्वावर गूगल व्ह्यूमधून पाहता येऊ शकतात.
बातम्या आणखी आहेत...