आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाच सर्व्हरवर देशातील केंद्रीय विद्यापीठांचा डेटा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिलासपूर - देशभरातील केंद्रीय विद्यापीठांचा डेटा आता एकाच सर्व्हरवर सुरक्षित राहील. क्लाउडिंग कॉम्प्युटिंगच्या माध्यमातून हे शक्य होणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने सर्व केंद्रीय विद्यापीठांच्या अॅप्लिकेशन्सला क्लाउडिंग कॉम्प्युटिंगद्वारे डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी परिपत्रक जारी केले आहे. यासाठी विद्यापीठाला अर्ज करावा लागेल.
आतापर्यंत केंद्रीय विद्यापीठ स्वत:च्या सोयीनुसार ऑनलाइन सॉफ्टवेअर तयार करत होते. काम ऑनलाइन झाल्यासोबत डेटाही सुरक्षित राहील. केंद्रीय विद्यापीठात विद्यापीठ व्यवस्थापनप्रणाली तयार केली आहे. देशभरातील केंद्रीय विद्यापीठांनी आपल्या अॅप्लिकेशन्सना एकत्रित करून क्लाउडिंग कॉम्प्युटिंगद्वारे जोडावे,अशी यूजीसीची इच्छा आहे. यामुळे डेटा कोठूनही अॅक्सेस करता येऊ शकेल. यासाठी संस्थांकडे इंटरनेटची सुविधा असणे बंधनकारक आहे. आता ही सर्व सुविधा वेब सेवांद्वारे मिळेल. एवढेच नव्हे, तर गुगल गिअरच्या माध्यमातून तुम्हाला अशा प्रकारच्या अनेक सुविधा ऑफलाइनही मिळतील.

असे होतील फायदे
{ हा चालवण्याचा खर्चही कमी आहे. कारण यामुळे वापरानुसार देयकाची सुविधा आहे.
{ ही अॅमेझॉन डॉट कॉमसारख्या मोठ्या विश्वासार्ह कंपन्यांकडून दिली जाणारी सेवा आहे.
{ कमी किंवा जास्त क्षमतेत याची खरेदी केली जाऊ शकते. हा बदल एक तासापेक्षाही कमी अवधीचा आहे.
{ क्लाऊड ऊर्जेची बचत करण्यासोबत कार्बन उत्सर्जन कमी करून पर्यावरण रक्षणात साहाय्यभूत आहे.
डेटा सुरक्षित राहील
^यूजीसीकडून सुरू होणाऱ्या या सुविधेचा सर्व केंद्रीय विद्यापीठांना फायदा मिळेल. ते आपल्याकडील प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आदी प्रक्रियांना या सेवेशी जोडू शकतात. यूजीसीच्या या सुविधेमुळे सर्व केंद्रीय विद्यापीठांचा डेटा सुरक्षितही राहील.
- डॉ. अमित सक्सेना, तज्ज्ञ, कॉम्प्युटर सायन्स, गुरू घासीदास केंद्रीय विद्यापीठ
बातम्या आणखी आहेत...