आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Centre Likely To Introduce A Bill In The Winter Session Of The Parliament To End Triple Talaq

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ट्रिपल तलाक रोखण्यासाठी केंद्र तयार करणार कायदा, हिवाळी अधिवेशनात येऊ शकते विधेयक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - ट्रिपल तलाक रोखण्यासाठी किंवा ही पद्धत संपुष्टात आणण्यासाठी केंद्र सरकार हिवाळी अधिवेशनात विधेयक सादर करण्याची शक्यता आहे. न्यूज एजन्सी एएनआयच्या मते, यासाठी मंत्र्यांची एक समिती स्थापन केली आहे. ही समिती हा कायदा तयार करणार असून सरकार हे विधेयक आगामी अधिवेशनात सादर करणार आहे. सुप्रीम कोर्टाने 22 ऑगस्टला 1400 वर्षे जुन्या तीन तलाक पद्धतीवर बोलताना म्हटले होते की, एकाचवेळी तीन वेळा तलाक म्हणून घटस्फोट देणे, ही पद्धत वॉइड (शून्य), अनकॉन्स्टिट्युशनल (घटनाबाह्य) आणि इलिगल (बेकायदेशीर) आहे. 


SC ने तलाकच्या मुद्द्यावर 6 महिन्यांत कायदा तयार करण्याचा निर्देश दिला होता
ऑगस्टमध्ये 5 जजच्या बेंचने 3:2 च्या बहुमताने एकाचवेळी तीनदा तलाक म्हणूण्याची पद्धत म्हणजे तलाक-ए-बिद्दत वॉइड वॉइड (शून्य), अनकॉन्स्टिट्युशनल (घटनाबाह्य) आणि इलिगल (बेकायदेशीर) आहे असे म्हटले होते. या बेंचमधील दोन जजने म्हटले होते की, सरकारने तीन तलाकच्या मुद्द्यावर 6 महिन्यांत कायदा करावा असे म्हटले होते. 


सरकारची भूमिका 
कायदेमंत्री रविशंकर प्रसाद याबाबत म्हणाले होते की, दोन जजेसने कायदा बनवण्याचा सल्ला दिला असली तरी बेंचच्या बहुमताच्या निर्णयाने तीन तलाकला घटनाबाह्य ठरवले आहे. त्यामुळे त्यासाठी कायदा तयार करण्याची गरज नाही. 


SC ने कोणता तलाक केला रद्द?
- तलाक-ए-बिद्दत म्हणजे एकाच वेळी तीनदा तलाक म्हणणे. हा हनफी पंथ मानणाऱ्या सुन्नी मुस्लिमांच्या पर्सनल लॉचा एक भाग आहे. त्याला सुप्रीम कोर्टाने घटनाबाह्य ठरवले आहे. त्यात व्हॉट्सअॅप, ईमेल, एसएमएस, फोन, चिट्ठी अशा विचित्र पद्धतींनी घटस्फोट देण्यावर बंदी लागेल. 
- असे तलाकनामा लिहून किंवा फोनवर टेक्स्ट मॅसेज करूनही करता येईल. त्यानंतर पुरुषाला जर त्याने घाई केली असे वाटले तरीही त्याला काही करता येणार नाही. घटस्फोटीत जोड्याला हलालानंतरच परत लग्न करता येते. 


हे तलाक आहेत कायम?
- तलाक-ए-बिद्दत रद्द जाला आहे, पण सुन्नी मुस्लीमांकडे तलाक-ए-अहसन आणि तलाक-ए-हसन हे दोन पर्याय आहेत. 
- तलाक-ए-अहसननुसार मुस्लीम पुरुष पत्नीला महिन्यातून एकदा तलाक म्हणू शकतो. 90 दिवसांतही तडजोड झाली नाही तर तीन महिन्यात तीन वेळा तलाक म्हणून तो पत्नीपासून वेगळा होऊ शकोत. या दरम्यान पत्नी इद्दत (सेपरेशनचा काळ) मध्ये राहते. हा काळ पहिल्यांदा तलाक म्हणण्यापूर्वी सुरू होतो. 
- तलाक-ए-हसनमध्ये पती पत्नीला मेन्स्ट्रूएशन सायकल (मासिक पाळी) दरम्यान तलाक म्हणतो. तीन सायकलमध्ये तलाक म्हटल्याने घटस्फोट पूर्ण होतो. 
- तीन तलाक प्रकरणात सुनावणी केलेले माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी स्पष्ट केले की, सुप्रीम कोर्टाने फक्त एकाच वेळी तीन तलाक म्हणण्यावर (तलाक-ए-बिद्दत) बंदी लावली आहे. 

बातम्या आणखी आहेत...