राजकोट- राजकोट पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत एका साखळी चोराला काही तासांतच जेरबंद केले आहे. शहरातील कालावड मार्गावर चित्रकूट सोसायटीतील रहिवासी शांताबेन परसाणा या गुरुवारी (6 नोव्हेंबर) सकाळी भक्तिधाम मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. मंदिरातून घरी येत असताना पंचवटी सोसायटीच्या चौकात अज्ञात भामट्याने दुचाकीवर येऊन शांतबेन यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून फरार झाला होता.
या घटनेची माहिती मिळताच क्राइम ब्रॉन्चचे पीएसआय एस.एस. निनामा हे मालविया नगर पोलिसांसह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पंचवटी सोसायटीच्या चौकात लावलेल्या सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे दुचाकीचा क्रमांक आणि शांताबेन यांनी सांगितले आरोपीच्या वर्णनावरून आरोपीला काही तासांतच जेरबंद केले. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने साखळी चोरीचा गुन्हा केल्याचे आरोपीने पोलिस चौकशीत सांगितले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, सीसीटीव्ही फुटेज आधारावर असा पकडला साखळी चोर...