आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Chairs Thrown In Jammu And Kashmir Assembly Over Mehbooba Mufti's Article 370 Chairs Thrown In Jammu And Kashmir Assembly Over Mehbooba Mufti's Article 370 Remark

जम्मू-काश्मीर विधानसभेत तोडफोड, मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्तींच्या कलम 370 संबंधी विधानावरून गोंधळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू- संविधानातील कलम ३७० संबंधी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्तींच्या विधानावरून बुधवारी जम्मू-काश्मीर विधानसभेत विरोधकांनी गोंधळ घालत फर्निचरची तोडफोड केली. माइक उखडून फेकले.

उमर अब्दुल्ला यांनी कलम ३७० बाबत मेहबूबांचे वक्तव्य कामकाजातून काढण्याचे आदेश दिले की नाही अशी विचारणा अध्यक्ष कविंदर गुप्तांकडे केली. त्यावर अब्दुल्ला यांनी स्पष्टीकरणही मागितले होते. आधी त्यांनी वक्तव्य कामकाजातून काढल्याचे सांगितले. नंतर विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात येत आहे, असे ते म्हणाले. त्यावर काँग्रेस व नॅशनल कॉन्फरन्सचे सदस्य संतप्त झाले. 

कलम ३७० ला विरोध देशद्रोह 
मंगळवारी िवधानसभेत संविधानातील कलम ३७० ला विरोध करणे हा मोठा देशद्रोह आहे, असे मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या होत्या. त्यावर विरोधी आमदारांनी आक्षेप घेत व तोडफोड केली. त्यामुळे  ७ फेब्रुवारी रोजी संपणारे विधानसभेचे अधिवेशन बुधवारीच गुंडाळावे लागले.
बातम्या आणखी आहेत...