आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘चंदन-साप’ ट्विटचे वादंग; लालू-नितीशकुमार भेट, उभय नेत्यांकडून एकजुटीचे दर्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पटणा- बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या ‘चंदन-साप’ या वादग्रस्त टि्वटच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी रात्री त्यांनी राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांची भेट घेतली. त्यामुळे या वादंगावर पडदा पडल्याचा दावा उभय नेत्यांकडून करण्यात आला.

बिहारमध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्याअगोदर विरोधी पक्षांसोबत वाक््युद्ध सुरू असतानाच सत्ताधारी आघाडीतही वाद सुरू असल्याच्या बातम्या झळकल्या होत्या. मीडियातील बातम्यांनी नितीशकुमार आणि लालू यांच्यात मतभेद असल्याचे म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर नितीशकुमार यांनी ‘बडे भाईं’ची भेट घेतली. परंतु ही भेट वादंगाच्या मुद्द्यावर नव्हती, असे त्यांनी सांगितले. फोटोग्राफर त्यांची छायाचित्रे घेण्यासाठी समोर आले तेव्हा दोघांनीही हात हाती घेत एकजूट दाखवण्याचा प्रयत्न केला. चला, सगळे पार पडले, असे लालूंनी सूचकपणे सांगितले.

नेमका वाद काय ?
नितीशकुमार यांनी ट्विट करून चंदनावर साप असताे, परंतु त्यामुळे चंदनाला अपाय होत नाही, अशा आशयाचे वक्तव्य केले होते. स्वत:ची चंदनाशी व लालूंची सापाशी तुलना केल्यावरून उभय नेत्यांमध्ये बिनसल्याची चर्चा मीडियात होती.