आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणत्याही परिस्थितीत व्हर्जिनिटी हवी, त्यासाठी हे सगळं करत आहेत GIRLS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्मक फोटो - Divya Marathi
प्रतिकात्मक फोटो
चंदीगड - विवाहपूर्व लैंगिक संबंध लपवण्यासाठी तरुणींमध्ये रिव्हर्जिनिटीसाठी सर्जरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. तरुणींसह विवाहित महिलाही अशी सर्जरी करण्यासठी अतुर आहेत. ज्या तरुणींनी विवाहाआधी लैंगिक संबंध प्रस्थापित केले होते, त्या आता रिव्हर्जिनिटीची शस्त्रक्रिया करुन पतीला व्हर्जिन असल्याचे सिद्ध करु शकत आहेत.
लग्नाच्या मोसमात सर्जरीमध्ये वाढ, महिन्याला जवळपास 20 केसेस
रिव्हर्जिनीटीच्या या शर्यतीत विवाहित महिलाही आहेत. लग्नाचा 15वा किंवा 25वा वाढदिवस साजरा करताना रिव्हर्जिनीटीची सर्जरी करुन महिला पतीला व्हर्जिनीटीचे अनोखे गिफ्ट देत आहेत. पत्नीच्या या आगळ्या-वेगळ्या गिफ्टने पतीही त्यांच्या या अदांवर घायळ होत आहेत. चंदिगडमधील प्लास्टिक सर्जन डॉ. दिपक कालिया यांनी सांगितल्यानूसार, आठवड्यात चार ते पाच सर्जरी होत आहेत. मात्र लग्नाच्या मोसमात त्यात वाढ होत असल्याचे अलिकडच्या काळात दिसून आले. अशा पद्धतीचे सर्जरी करण्याचे प्रमाण वाढले असून महिन्याला जवळपास 20 केसेस येत आहेत. याचा खर्च साधारण 45 हजार रुपये आहे.

परदेशातूनही येतात तरुणी
चंदीगड आणि आसपासच्या जिल्ह्यांसह एनआरआय आणि परदेशातील तरुणीही सर्जरी करुन घेण्यासाठी 'सिटी ऑफ ब्यूटीफुल'कडे वळत आहेत. विशेषतः मुस्लिम देशातील तरुणी वर्जिनिटी नसणे वैवाहिक जीवनात अडचणीचे ठरु नये म्हणून ही सर्जरी करुन घेण्याला प्राधान्य देत आहेत. डॉक्टर म्हणाले, तरुणी आणि महिला हायमनोप्लास्ट किंवा रिव्हर्जिनायझेशन बद्दल अलिकडच्या काळात क्रेझी झाल्या आहेत.
सामाजिक भय...
भारतीय समाजात लग्नाआधी लैंगिक संबंध ठेवणे म्हणजे वैवाहिक आयुष्यात भूकंपच आहे. या भीतीने शहरातील तरुणी रिव्हर्जिनायझेशन सारखी प्लास्टिक सर्जरी करुन घेत आहेत. या सर्जरीसाठी प्रसिद्ध असलेले डॉ. कालिया म्हणाले, भारतात या सर्जरीची कन्सेप्ट फार पूर्वीपासून चालत आली आहे, मात्र अशी सर्जरी करुन घेण्यासाठी फार तुरळक तरुणी पुढे येत होत्या. मात्र परदेशातून मोठ्या प्रमाणात युवती या सर्जरीसाठी येत होत्या, आता चंदिगडच्या उच्चभ्रू समाजातील मुलींमध्येही हा ट्रेंड रुजला आहे.
लग्नाच्या वाढदिवसाचे गिफ्ट...
रिव्हर्जिनायझेशन तज्ज्ञ डॉ. रिता सेखो यांच्या म्हणण्यानूसार, लग्नाच्या वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून विवाहित महिला देखील आता ही सर्जरी करुन घेत आहेत. विवाहित महिला लग्नाचा 15वा किंवा 25वा वाढदिवस साजरा करताना रिव्हर्जिनीटीची सर्जरी करुन पतीला व्हर्जिनीटीचे अनोखे गिफ्ट देत आहेत. मानसोपचार तज्ज्ञ बी.के.बरेच यांच्या मते महिलांमध्ये याबद्दलची वाढलेली क्रेझ आश्चर्यकारक आहे.

वैवाहिक जीवन सुखाचे व्हावे यासाठी...
न्यूझीलंड येथे राहाणारी हरमनप्रीत कौर (नाव बदलेल आहे) म्हणाली, परदेशात शारीरिक संबंध ही सर्वसाधारण बाब आहे. माझेही शारीरिक संबंध होते, मात्र ज्या तरुणासोबत माझा विवाह होत आहे तो पारंपरिक भारतीय मुलगा आहे आणि त्याचे कुटुंब देखील परंपरावादी आहे. त्यामुळे वैवाहिक जीवन सुख-शांतीचे असावे यासाठी मी चंदीगडला येऊन ही सर्जरी करुन घेतली. परदेशात त्यासाठी खूप पैसे मोजावे लागतात.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, संबंधित छायाचित्र
बातम्या आणखी आहेत...