आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: रशियन सौंदर्यवतीने सात समुद्रपार येऊन मंदिरात केले लग्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रशियन तरुणीने भारतीय तरुणासोबत केले लग्न. - Divya Marathi
रशियन तरुणीने भारतीय तरुणासोबत केले लग्न.
चंदीगड - 'सात समुंदर पार मैं तेरे पीछे-पीछे आ गई...' त्रिदेव चित्रपटात दिव्या भारती, सनी देओलसाठी हे गीत गाते. रिअल लाइफमध्येही असेच काही घडले आहे चंदीगडमध्ये. रशियन तरुणी मरीना बिलोव्हा प्रियकर राजेश पिल्लईसाठी सात समुद्र ओलांडून भारतात आली आहे. ती भारतीय संस्कृतीला आपले करत शुक्रवारी राजेशसोबत विवाह बंधनात अडकली. दोन वेगवेगळे देश आणि त्यांच्या वेगवेगळ्या परंपरा संस्कृती तरीही हे लग्न कसे जुळले, याबद्दल राजेशने सांगितले, दोन वर्षांपूर्वी मी मित्रांसह ऋषिकेशला गेलो होतो. तिथे मरीना तिच्या ग्रुपसह आली होती. त्या ट्रीपवर आमचे एक-दोनदा बोलणे झाले होते. पण माहित नव्हते की, मरीना चंदीगडमध्येच राहात आहे.
चितकारा विद्यापीठात इंटर्नशिप करत होती
मरीना रशियाहून चितकारा विद्यापीठात इंटर्नशिपसाठी आली होती. येथील मित्र-मैत्रिणींसोबत ती ऋषिकेशला आली होती. तेथून परतताना अंबाला स्टेशनवर जेव्हा जो-तो आपापल्या मार्गाने निघाला तेव्हा मी बसने चंदीगडला जाण्याचे ठरवले आणि माझ्यासोबत कोणाला येण्याची इच्छा आहे ते विचारले. तेव्हा मरीना म्हणाली - आय विल गो विद यू. त्या दिवसापासून आमच्यात संभाषण सुरु झाले. पुढे भेटी वाढल्या.
सततच्या भेटीचे प्रेमात रुपांतर...
मरीना सांगते, एकदा आम्ही रेल्वेने जैसलमेरला निघालो होतो. बोलता-बोलता अचानक राजेशने मला प्रपोज केले. मी हसत त्याला विचारले ‘It’s a Joke’ त्यावर तो गंभीर होत म्हणाला, की माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि लग्न करण्याची इच्छा आहे.
कुटुंबियांची काय प्रतिक्रिया होती ?
राजेश म्हणाला, सुरुवातीला आमच्या दोघांचेही कुटुंबीय आमच्याबद्दल गंभीर नव्हते. कारण आमची भाषा, धर्म, पंरपरा सर्व काही वेगळे होते. मात्र आम्ही आमच्या निर्णयावर ठाम होतो. आम्ही आई-वडिलांनाही राजी केले. जोड्यातर वरतीच ठरतात हे त्यांना पटवून दिले, जे वरतीच ठरले आहे त्याला तुम्ही आशीर्वाद द्या, असे आम्ही त्यांना सांगितले.

दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहाल्यानंतर राजेश आमि मरीनाने शुक्रवारी लग्न केले. या दोन वर्षांच्या काळातील त्यांच्या अनेक आठवणी आहेत. मरीनाबद्दल बोलताना राजेश म्हणाला, एक महिन्यापूर्वी तिच्या आई-वडिलांना समजवायला मी रशियाला गेलो होतो. मात्र त्यांचा होकार काही मिळाला नाही. मी तिथून निघाल्यानंतर मरीनाने माझा हात पकडला आणि मी देखील इंडियाला येणार असे तिने ठामपणे सांगितले. आता संपूर्ण आयुष्य एकमेकांनी सोबतच राहायचे असे तिने पक्के केले होते. राजेशची सहकार्याची भावना आणि केअरिंग नेचर आवडल्याचे मरीना सांगते. राजेशसाठी मरीना आता मल्याळम शिकत आहे.
पुढील स्लाइड मध्ये पाहा, राजेश आणि मरीनाच्या लग्नाचे फोटोज्..
बातम्या आणखी आहेत...