आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chandigarh To Ban Short Skirts In Discotheques And Bar

चंदीगडमध्ये शॉर्ट स्कर्टवर येऊ शकते बंदी, प्रशासन म्हणाले- आता सहन होणार नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंजाब-हरियाणा हायकोर्टाने बार-डिस्कोथेकसाठी एक नियमावली तयार करण्याचा आदेश दिला होता. (फाइल फोटो) - Divya Marathi
पंजाब-हरियाणा हायकोर्टाने बार-डिस्कोथेकसाठी एक नियमावली तयार करण्याचा आदेश दिला होता. (फाइल फोटो)
चंदीगड - डिस्कोथेकमध्ये जाणाऱ्या महिलांनी कोणते कपडे घालावे आणि कसे राहावे यावर नियंत्रण आणण्याचा आता प्रशासन विचार करत आहे. डेस्कोथेमध्ये शॉर्टस्कर्टवर बंदी येण्याची शक्यता आहे. प्रशासनाचे म्हणणे आहे, की महिलांनी कमी कपड्यांमध्ये डिस्कोथेकमध्ये जाणे आणि कोणतेही गैरवर्तन यापुढे सहन केले जाणार नाही.

एक एप्रिलपासून लागू झाला नियम
- प्रशासनाने 'कंट्रोलिंग ऑफ प्लेसेस ऑफ पब्लिक अॅम्यूजमेंट, 2016' नियमांतर्गत डिस्कोथेकमध्ये जाणाऱ्या महिलांच्या पेहरावावर निर्बंध आणण्याचा विचार केला आहे.
- हा नियम एक एप्रिलपासून लागू झाला आहे.
- वास्तविक अनेकांनी या नियमांची काहीही गरज नसल्याचे म्हटले आहे.
- मात्र, प्रशासन या नियमांतर्गत शहरातील नाइटक्लब आणि डिस्कोथेकमध्ये जाणाऱ्या महिलांच्या पेहरावावर लक्ष्य ठेवून आहे आणि शॉर्टस्कर्ट किंवा पारदर्शक कपडे असणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारणार आहे.
- प्रशासनातील अधिकाऱ्यांनी असाही दावा केलाआहे, की अशा प्रकारच्या बार आणि डिस्कोथेकमध्ये राष्ट्रविरोधी कारवायांना प्रोत्साहन मिळत आहे.

काय होता हायकोर्टाचा आदेश
- गेल्या काही दिवसांमध्ये डिस्कोथेकमध्ये अनेक गुन्हेगारी घटना घडल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.
- याची दखल घेत पंजाब-हरियाणा हायकोर्टाने चंदिगड प्रशासनाला बार-रेस्तराँ संबंधी एक नियमावली तयार करण्यास सांगितली होती.

काय म्हणाले अधिकारी
- सहसचिव करनैलसिंग म्हणाले, 'हायकोर्टाच्या आदेशानुसार आम्ही नियमावली तयार केली आहे. आमचा उद्देश नाइटलाइफ सुरक्षित आणि कायदा-सुव्यवस्था कायम ठेवण्याचा आहे.'
पुढील स्लाइडमध्ये वाचा, काय आहेत नियम