आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चांद्रयान मोहिम: मंगळयानाची परिभ्रमण कक्षा पाचव्यांदा वाढवली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - मंगळयानाची परिभ्रमण कक्षा शनिवारी सकाळी पुन्हा वाढण्यात आली. परिभ्रमण कक्षा मार्गात पाचव्यांदा करण्यात आलेल्या विस्तारानंतर आता यान पृथ्वीपासून एक लाख 90 हजार कि.मी. लांब अंतरावरील कक्षेत स्थिरावले आहे.
इस्रोने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले की, परिभ्रमण कक्षेच्या विस्तारासाठी मोटारींना 243.5 सेकंदापर्यंत चालवण्यात आले. यामुळे मंगळयान 118.642 कि.मी. अंतरावरून 192874 कि.मी. अंतरावरील कक्षेत स्थिरावले. यादरम्यान, यानाची गती 101.55 मीटर प्रतिसेकंद होती. मंगळयान आता 30 नोव्हेंबर आणि एक डिसेंबरच्या मध्यरात्री मंगळाच्या दिशेने रवाना होईल.