आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chandrayan Program : Mar Orbitor Out Of Earth Effect

चांद्रयान मोहिम: मंगळयान पृथ्वीच्या प्रभाव क्षेत्राबाहेर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - भारताचे मंगळ यान पृथ्वीच्या प्रभाव क्षेत्राबाहेर पडले आहे. 9 लाख 25 हजार किलोमीटरपर्यंत पृथ्वीचे प्रभाव क्षेत्र मानण्यात येते. पुढील दहा महिन्यांत (सप्टेंबर 2014) हे मंगळ यान मंगळ ग्रहावर पोहोचणार आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) दिलेल्या माहितीनुसार काल रात्री 1 वाजून 14 मिनिटांनी मंगळ यान पृथ्वीच्या प्रभाव क्षेत्राबाहेर पडले. दक्षिण अफ्रिकेतील वादळामुळे यानाशी पाच मिनिटे संपर्क तुटला होता. त्यामुळे यान दृष्टीआड गेले होते. मंगळ ग्रहावर पोहोचण्याच्या प्रवासात यानासाठी इस्रोने चार मीड कोर्स करेक्शन प्लान तयार केले आहेत. मंगळ यान मार्गात भरकटले तर त्यावेळी या योजना अमलात आणण्यात येतील. हे त्रुटी निवारण योजना 11 डिसेंबर, एप्रिल आणि ऑगस्ट तसेच 14 सप्टेंबर 2014 पर्यंतच्या कालावधीसाठी आहेत.