आग्रा/मथुरा- वृंदावनमध्ये होळीनिमित्त विशेष सत्संग उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. टीव्ही मालिका 'महाभारत'चे 4 कलाकार या उत्सवात सहभागी होणार आहेत. चंद्रोदय मंदिराच्या कन्स्ट्रक्शन साइटवर हा उत्सव होणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्या 'एंटीलिया' बंगल्यापेक्षा हे मंदिर उंच असेल, असे प्रोजेक्ट डायरेक्टर सुबयुक्ता नरसिंहा दास यांनी सांगितले आहे.
अमेरिकेतून आले डिझायनर...- इस्कॉन सोसायटीने वृंदावनमध्ये जगातील सर्वात उंच मंदिराचे कन्स्ट्रक्शन सुरु झाले आहे.
- चंद्रोदय मंदिराला पिरामिडचा डेव्हलप फॉर्म असेही संबोधण्यात येत आहे.
- मंदिराच्या स्ट्रक्चरल डिझायनिंगसाठी इस्कॉन सोसायटीने अमेरिकेतील स्ट्रक्चरल इंजिनियरिंग कंपनी 'थॉर्नटन टोमासेटी'सोबत करार केला आहे.
- मंदिराच्या कन्स्ट्रक्शनची जबाबदारी गुडगावमधील इनजीनियस स्टूडिओ व नोएडातील क्विनटेसेंस डिझाइन स्टूडिओने स्विकारली आहे.
- 2006 मध्ये मंदिराची कल्पना करण्यात आले होते. 8 वर्षांपासून या कल्पनेवर काम करण्यात आले. 2014 मध्ये मंदिराच्या कामास सुरुवात झाली आहे.
- 2022 मध्ये मंदिराचे काम पूर्ण होणार असल्याचे प्रोजेक्ट डायरेक्टर दास यांनी म्हटले आहे.
होळीनिमित्त महाभारताची टीम येणार...- 23 मार्चला होळी आहे. होळीनिमित्त सत्संग उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवात टीव्ही मालिका 'महाभारत'तील चार कलाकार सहभागी होणार आहेत.
- यात सौरभ राज जैन (श्रीकृष्ण), पूजा शर्मा (द्रौपदी), आरव चौधरी (भीष्म) व प्रणीत भट्ट (शकुनी मामा) यांचा समावेश असेल.
पुढील स्लाइड्सवर पाहा, मुकेश अंबानींच्या 'एंटीलिया' बंगल्यापेक्षा उंच उभारले जाणार्या मंदिराच्या डिझाइनचे ग्राफिक्स...