आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chanrababu Naidu News In Marathi, Divya Marathi, Telgu Desam Party

मनमानी राज्य विभाजनाचा फटका आंध्र प्रदेशलाच - चंद्राबाबू नायडू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - यूपीए सरकारने आंध्र प्रदेशचे विभाजन मनमानी पद्धतीने केले. त्यामुळे आर्थिक आणि नैसर्गिक संसाधनांबाबत तेलंगणपेक्षा आंध्रचे जास्त नुकसान झाले, असा आरोप मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी रविवारी केला. राज्याच्या पुनर्गठनामुळे झालेल्या परिणामावर नायडू यांनी रविवारी श्वेतपत्रिका काढली.
आंध्र प्रदेश पुनर्गठन कायदाच अन्यायाचा मुख्य स्रोत आहे. त्यामुळे आंध्रचेच जास्त नुकसान होत आहे, असा आरोप त्यांनी केला. विभाजित आंध्र प्रदेशात हैदराबादसारखे नवीन शहर वसवण्यासाठी 4 ते 5 लाख कोटी खर्च होतील. यूपीए सरकार तर तेलंगणसाठी राजधानीचे शहरही शोधू शकले नाही. अर्थात आम्ही 10 वर्षांपर्यंत राहू शकतो. कायद्यानुसार 10 वर्षांपर्यंत हैदराबाद दोन्ही राज्यांची संयुक्त राजधानी असेल, असा उल्लेखही त्यांनी केला.

तेलंगणमध्ये मंगळवारपासून सर्वेक्षण : तेलंगणमध्ये राहणा-या नागरिकांचा डाटाबेस तयार करण्यासाठी राज्यात 19 ऑगस्टपासून सर्वेक्षण करण्यात येईल. त्यासाठी तामिळनाडूत स्थायिक तेलंगणचे मूळ नागरिक राज्यात पाहोचत आहेत.