आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारा घोटाळ्याच्या फाइल्स गायब; लालू प्रसाद आरोपी, ‌BJPने साधला निशाणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा- बिहारमधील बहुचर्चित चारा घोटाळ्याच्या महत्त्वपूर्ण फाइल्स सचिवालयातून चोरीस गेल्याचे निदर्शनास आले आहे. सचिवालयातील फाइल विभागाचे टाळे तोडून चारा घोटाळ्याशी संबंधित फाइल्स लांबवण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चारा घोटाळ्‍यासह इतर महत्त्वपूर्ण फाइल्स देखील चोरीस गेल्याचे समजते.

फाईल विभागाने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे. दुसरीकडे, भाजपने मुख्यमंत्री नीतीशकुमारसह निशाणा साधला आहे. लालू प्रसाद यादव हे चारा घोटाळ्‍यात आरोपी असून त्यांचा बचाव करण्‍यासाठी नीतीशकुमार सरकारचे कारस्थान असल्याचा आरोपही भाजपने केला आहे.

भाजपने साधला निशाणा...
- भाजपचे आमदार नितिन नवीन यांनी सांगितले की, फाईल्‍स गहाळ झाल्यानंतर त्या चोरी झाल्या आहेत. नीतीशकुमार, लालू प्रसाद व राम जेठमलानी यांचे हे कारस्थान असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
- लालू प्रसाद यांना खुश करण्यासाठी नीतीश कुमार यांनी फाइल्स गायब केल्या आहे.
- फाइल्स गायब करून लालूंना पाठीशी घेण्याचा नीतीशकुमारांचा प्रयत्न सुरु आहे.
जदयूने दिले स्पष्टीकरण...
- जदयूचे प्रवक्ता श्याम रजक यांनी सांगितले की, पो‍लिस याप्रकरणी चौकशी करत आहे.
- चौकशीत जो कोणी दोषी आढळेल त्याला त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.

पुढील स्लाइडवर वाचा, अत्यंत सुरक्षित ठिकाणाहून फाइल्स लांबवल्या...
बातम्या आणखी आहेत...