आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिहारमध्ये 2.5 कोटी रुपये किमतीचे 12.5 किलो चरस जप्त, तस्कर फरार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेट्टीह (बिहार)- इंडो-नेपाळ सीमेवरील पश्चिम चंपारण जिल्ह्यात सशस्त्र सीमा दलाने मोठ्या प्रमाणावर चरस या अमली पदार्थाचा साठा पकडला आहे. सीमा दलाने घातलेल्या छाप्यात सुमारे १२.५ किलो चरस जप्त केले असून आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत सुमारे २.५ अडीच कोटी रुपये इतकी आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. इनरवा सीमेजवळ रविवारी रात्री हा साठा जप्त करण्यात आला. चरस तस्करांना थांबवण्याचा जवानांनी प्रयत्न केला होता, पण चरसच्या बॅगा टाकून ते पळून गेले, अशी माहिती उपकमांडंट ४४ बटालियन एसएसबी, अजयकुमार राजक यांनी दिली.  


अमली पदार्थाचा साठा घेऊन भारतीय सीमेत तस्कर शिरले असल्याची माहिती मिळाली होती.  त्यांचा शोध घेण्यासाठी नेमलेल्या पथकाने या तस्करांना थांबवण्याचा प्रयत्न केला. पण जवानांचा सुगावा त्यांनाही लागला होता. त्यामुळे ते पळून जाण्यात यशस्वी ठरले. पकडण्यात आलेला १२.५ किलोचा साठा इनरवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे, असे राजक यांनी सांगितले.


बिहारमध्ये गेल्या वर्षापासून नितीशकुमार यांनी राज्यात संपूर्ण दारूबंदी लागू केली. तरीही तेथे अवैध दारूंचा साठा सापडला जातो. आता चरस विक्री होत असल्याचेही निदर्शनास आले आहे. 

बातम्या आणखी आहेत...