आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Charge Sheet Filed Against Reddy In The Case Of 53 Crores Scam

५३ कोटींच्या घोटाळाप्रकरणी रेड्डींवर आरोपपत्र दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - येथील इंदू प्रोजेक्ट्स लिमिटेड या खासगी कंपनीच्या ५३ कोटींच्या रिअल इस्टेट घोटाळाप्रकरणी वायएसआर काँग्रेसचे प्रमुख व आंध्र प्रदेशचे विरोधी पक्षनेते वाय. एस. जगनमोहन रेड्डी दोषी आढळले आहेत. इंदू प्रोजेक्ट्सचे प्रमुख इंदुकुरी श्यामप्रसाद रेड्डी यांच्याकडून लाच स्वीकारल्याचा आरोप सीबीआयने जगमोहन यांच्यावर लावला आहे. यात इंदुकुरी यांच्यावरही कारवाई सुरू आहे. कंपनीत गुंतवणूकदार म्हणून जगनमोहन यांचे नाव इंदुकुरींनी दाखवले आहे. महसूल संचालकांनी आर्थिक अपहाराच्या गुन्ह्याची नोंद केली आहे.
रंगा रेड्डी जिल्ह्यात (तेलंगणा) या समूहाने कंपनीच्या व विविध घटक कंपन्यांच्या नावे जमीन अधिग्रहित केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. जिल्ह्यात कंपनीने एकूण २ हजार ८३५ स्क्वेअर यार्ड जमीन शासनाकडून अवैधरीत्या ताब्यात घेतली आहे. आंध्रातील मोठ्या प्रकल्पांच्या माध्यमातून जगनमोहन यांनी प्रचंड भ्रष्टाचार केल्याचे उघडकीस आले होते. त्यांची व्यक्तिगत मालमत्ता ८६३ कोटींची असल्याचे महसूल संचालकांनी म्हटले आहे. त्यांची बड्या कंपन्यांमध्ये भागीदारीही दिसून आली आहे.