जोधपूर - मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील आश्रमात गुरुकुलच्या अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आसारामबापूंसह पाच जणांवर सामूहिक अत्याचाराचे आरोप ठेवण्यात आले आहेत. जिल्हा सत्र न्यायालयात आसाराम यांच्यासह पाच जणांविरोधात ठेवण्यात आलेल्या आरोपांची सुनावणी 13 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. आरोपी त्यांच्यावर ठेवलेल्या आरोपांबाबत त्याच दिवशी कबुली देऊ शकतात किंवा ते फेटाळून सुनावणी घेण्याची मागणी करू शकतात.
न्यायाधीश मनोजकुमार व्यास यांनी आरोपींविरोधात ज्या कलमांखाली आरोप निश्चित केले आहेत, ते सिद्ध झाल्यास त्या दोषींना किमान 20 वर्षांपर्यंतची जन्मठेप तसेच आर्थिक दंडाची तरतूद आहे. दंडविधान (सुधारित) अधिनियम 2013 नुसार न्यायाधीश आरोपींची शिक्षा उर्वरित आयुष्यकाळापर्यंत वाढवू शकतात.
शुक्रवारी झालेल्या आरोप निश्चितीच्या कारवाईच्या वेळी विशेष सरकारी वकील राजूलाल मीणा व पीडित मुलींच्या कुटुंबीयांच्या वतीने प्रमोदकुमार वर्मा, बचाव पक्षाच्या वतीने महेश बोडा व प्रदीप चौधरी उपस्थित होते. त्यांनी या आरोपांना उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे स्पष्ट केले. आरोप निश्चित करण्यात आले त्या वेळी सर्व आरोपी न्यायालयात उपस्थित होते. पीडित कुटुंबीयांनी आम्हाला न्यायालयात न्याय मिळेल, दोषी आरोपींना कठोर शिक्षा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
हे आहेत आरोपी?
प्रकाश : स्वयंपाकी गोरेगाव, मुंबई
शिवा : सेवेकरी गोरेगाव, मुंबई
शरदचंद्र : सेवेकरी हैदराबाद
शिल्पी : वॉर्डन (छत्तीसगड आश्रम)
पुढे काय?
आरोपींच्या वकिलांनी या आरोपांना उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे म्हटले आहे.
फिर्यादी पक्षासाठी
013 फेब्रुवारी रोजी सर्व आरोपींना न्यायालयात हजार केले जाईल. त्यांच्यावर ठेवलेले आरोप त्यांना वाचून दाखवले जातील.
0आरोप सांगितल्यानंतर बचाव पक्ष 58 साक्षीदारांना कोर्टासमोर हजर करण्याची परवानगी मागेल.
0उच्च् न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी दररोज करण्यात यावी, असे आदेश न्यायालयाने आधीच दिले आहेत. मूळ आरोपपत्र 22 पानांचे असून 121 कागदपत्रांची हजार पाने नंतर जोडली आहेत.
हे आहेत आरोप
* सामूहिक अत्याचाराचे कलम 376 (डी) आयपीसी
* रक्षणकर्त्याकडून महिलेवर बलात्कार कलम 376 (2)(एफ)
* अल्पवयीन दुर्व्यापार प्रकरण कलम 370(4) आयपीसी
* बालकांची संस्था, व्यवस्थापनाकडून अत्याचार कलम 376(सी)
* लैंगिक शोषण कलम 354 ए
* छळ, शिवीगाळ, अश्लील हावभाव कलम 506 व 509
* पोक्सो अँक्ट कलम 5, 6, 7/8 व 120 बी व 34.
ही शिक्षा शक्य
* 20 वर्षांपेक्षा कमी नाही. आजन्म तुरुंगावासही शक्य
* कमीत कमी दहा वष्रे, जास्तीत जास्त जन्मठेप
* दहा वर्षे किंवा जन्मठेप यापैकी काहीही
* पाच वर्षे ते दहा वर्षांपर्यंत कैद
* तीन वर्षांपर्यंत सश्रम कारावास
* तीन वर्षांची शिक्षा शक्य
* दहा वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा अनेक वर्षे कारावास