आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतामध्ये आता चेस-बाॅक्सिंगचा प्रसार, राष्ट्रीय स्पर्धेला माेठा प्रतिसाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काेलकाता - मनाला शारीरिक अाव्हान देणाऱ्या एखाद्या खेळाचा प्रसार हाेऊ शकेल, याची साधी कल्पनाही काेणी केली नसेल. मात्र, याचाच प्रत्यय अाता काेलकाता येथे अायाेजित चेस-बाॅक्सिंगमधील युवा खेळाडूंकडे पाहिल्यानंतर येताे. जर्मनी, इंग्लंड, फ्रान्स अाणि रशियाच्या धर्तीवर अाता भारतामध्ये अशा प्रकारच्या स्पर्धेचे अायाेजन करण्यात अाले अाहे. याला माेठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत अाहे.

चेस बाॅक्सिंगमध्ये एकूण ११ फेऱ्यात हाेतात. यामधील सहा फेऱ्यांमध्ये चेस अाणि उर्वरित पाच राउंडमध्ये बाॅक्सिंग हाेते. दाेन्ही प्रतिस्पर्धी खेळाडू हे बाॅक्सिंगच्या रिंगमध्ये बसूनच बुद्धिबळ खेळतात. यामध्ये एक राउंड चेस अाणि दुसरा राउंड बुद्धिबळचाही हाेताे.
बातम्या आणखी आहेत...