आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

५०० गरिबांना बनवले सुरक्षा दलातील सैनिक, स्वतःची उंची कमी भरल्याने हुकली होती संधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजनांदगाव - छत्तीसगडमधील शंकरपूर उच्च माध्यमिक विद्यालयाचे शारीरिक शिक्षण विषयाचे शिक्षक ५० वर्षीय शैलेंद्र तिवारी यांना लष्करी सेवेत जाण्याची खूप इच्छा होती. परंतु केवळ दोन सेंटीमीटर उंची कमी भरल्याने ती संधी हुकली. परंतु त्यामुळे ते खचून गेले नाहीत. त्यांनी गरीब विद्यार्थ्यांना मदत करून त्यांना भारतीय सुरक्षा दलात पाठवण्याचा संकल्प केला. त्यांचे हे कार्य गेल्या २१ वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे. त्यांच्यामुळे आतापर्यंत ५०० हून अधिक गरीब तरुण थळ सेना, आरपीएफ, सीआरपीएफ, पोलिस दलात समाविष्ट होऊ शकले. त्यांची ही सेवा मोफत सुरू आहे.

१९८६ मध्ये तिवारी शारीरिक शिक्षण प्रशिक्षक म्हणून काम करू लागले. राजनांदगावमधील वसंतपूरच्या विद्यालयात शारीरिक शिक्षण प्रशिक्षक म्हणून नियुक्त झाले. या भागात आर्थिक कारणांमुळे गरीब मुले शिक्षण घेऊ शकत नाहीत. त्यांनी मुलांना सरकारी शाळेत शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्याच काळात विद्यार्थ्यांना शारीरिक प्रशिक्षण देण्यासही सुरुवात केली. जेणेकरून ते योग्य वयात सुरक्षा दलात सहजपणे प्रवेश करू शकतील. त्यांच्याकडे दुर्गम भागातून प्रशिक्षणासाठी तरुण येतात. सध्या ते पंचक्रोशीतील ४० हून अधिक तरुण-तरुणींना प्रशिक्षण देतात. तिवारी धावणे, उंच उडी, लांब उडी, गोळा फेक इत्यादी सर्व खेळांतील कौशल्य शिकवतात. त्यापैकी काही तरुणांना सायकलने प्रवास करून यावे लागते. उन्हाळ्याच्या दिवसांत तिवारी लहान मुलांसाठी अशा प्रकारचे प्रशिक्षण केंद्र सुरू करतात. त्यात किमान १५० विद्यार्थी सहभागी होतात. त्ययांच्या सुरक्षा दलासाठीच्या अप्रत्यक्ष योगदानाची दखल घ्यायला हवी.
एका वेळी ६० तरुणांची निवड : २०४-१५ हे वर्ष तिवारी यांच्या आतापर्यंतच्या साधनेतील सर्वात संस्मरणीय वर्ष ठरले. या वर्षी एकाच वेळी सर्वाधिक तरुणांची निवड झाली. जिल्हा पोलिस दलात २५ जणांची निवड झाली.