आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचंदीगड - कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण दत्त तिवारी यांनी रोहित शेखर हा आपला मुलगा असल्याचे कबुल केले आहे. एवढेच नाही तर त्याला वारसाहक्क देण्याचेही मान्य केले असताना हरियाणाचे मुख्यमंत्री भूपेंदसिंह हुड्डा यांनी दोन संसार थाटले असल्याचा आरोप आमदार अभयसिंह चौटाला यांनी केला आहे.
ऐनलाबादचे आमदार चौटाला यांनी विधानसभेच्या पत्रकार कक्षामध्ये हा मुद्दा उपस्थित करुन चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. मुख्यमंत्री हुड्डा यांची दुसरी पत्नी देहरादून येथे असल्याचेही त्यानी म्हटले.
मुख्यमंत्र्यांचे मौन
विरोधकांकडून करण्यात आलेल्या आरोपावर मात्र मुख्यमंत्री हुड्डा यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे. परंतु रोहतक येथील आमदार बीबी बत्रा या हुड्डा यांच्या बचावासाठी धावून आल्या. बत्रा म्हणाल्या, संबंधित महिलेने 17 डिसेंबर 13 रोजी एक याचिका दाखल केली होती. मात्र, कायदेशीर कारवाई सुरु होताच. संबंधित महिलेने याचिका मागे घेतली होती. ही महिलेला फूस लावण्यात विरोधकांचे कुटील कारस्थान असल्याचे बत्रा यांनी सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांचे आणि संबंधित महिलेचे नातेसंबंध काय? मुख्यमंत्री त्या महिलेला ओळखतात का? आता ती महिला कुठे आहे? अशा प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर मात्र, हुड्डा यांनी कमालीचे मौन बाळगले आहे.
हुड्डा यांनी 11 नोव्हेंबर 1992 रोजी दिल्लीत दुसरे लग्न केले होते. यानंतर मात्र हुड्डा यांचे पहिल्या पत्नीशी वाद झाल्याचाही आरोप विरोधकांनी केला आहे.
पुढील स्लाइडवर वाचा, कोणत्या कागदपत्राच्या आधारे लावण्यात आला आरोप...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.