आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन उत्पादन आल्याने डाळी स्वस्त; शेतकऱ्यांना तोटा, व्यापाऱ्यांना नफा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- रब्बी पिकांच्या काढणीला सुरुवात झाल्याबरोबरच पुन्हा एकदा डाळींच्या किमतीमध्ये घसरण होत आहे. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, शेतकऱ्यांना चांगली किंमत मिळत नसल्याने ते त्रस्त झाले आहेत, तर व्यापाऱ्यांच्या नफ्यात वाढ झाली आहे. 
 
गेल्या वर्षी १५ फेब्रुवारी रोजी किरकोळ बाजारात हरभरा डाळ ७३ रुपये किलो होती. ऑक्टोबरच्या शेवटपर्यंत ज्या वेळी रब्बी पिकांची पेरणी होती, त्या वेळी हरभरा डाळ दुपटीने महागून १४४ रुपये किलोवर पोहोचली होती. मात्र, नवीन उत्पादन येण्याच्या वेळी यात ३८ टक्क्यांची घट होऊन ती ८९ रुपये किलोवर आली आहे. याचप्रमाणे तूरडाळीची किंमत देखील १४३ रुपयांवरून कमी होऊन ८९ रुपये किलोवर आली आहे.   
 
उत्पादन : यंदा कडधान्याचे ३५ टक्के जास्त उत्पादन
जूनमध्ये संपत असलेल्या पीक हंगाम २०१६-१७ साठी आपल्या दुसऱ्या अंदाजात कृषी मंत्रालयाने कडधान्याचे विक्रमी २.२१४ कोटी टन उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. हा आकडा या आधीच्या पीक वर्षात झालेल्या १.६३५ कोटी टन उत्पादनापेक्षा ३५.४१ टक्के जास्त आहे. मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार हरभऱ्याचे ९१.२ लाख टन उत्पादन होणार आहे, तर तूर आणि उडदाचे अनुक्रमे ४२.३ आणि २८.९ लाख टन विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...