आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंगळुरूत अवकाळी पावसानंतर रासायनिक बर्फवृष्टी, प्रमुख रस्त्यावर साचले रसायनांचे ढग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - शहरात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसापासून लोकांना काहीसा दिलासा मिळाला तरी एक नवीन समस्या निर्माण झाली आहे. येथील रस्त्यांवर शनिवारी आणि रविवारी दोन्ही दिवस रासायनिक बर्फवृष्टी झाली. रस्त्यांवर रासायनिक बर्फाचे ढग साचल्याने येथून जाणाऱ्या आणि येणाऱ्यांना सुद्धा त्रास होत आहे. रासायनिक बर्फ हेल्मेट आणि कारच्या काचांवर पडत असल्याने अपघाताचा धोका सुद्धा निर्माण झाला आहे.
 
येथील वार्थुर सरोवरात अवकाळी पाऊस आणि सरोवरातील रसायनांचे मिश्रण होऊन रासायनिक फेस तयार झाला. ढगरुपी फेस वादळी वाऱ्याने वाहून रस्त्यांवर रासायनिक बर्फवृष्टीप्रमाणे उडत होते. काही तासांतच रस्त्यावर रासायनिक ढगांचा थर साचला आणि वाहतुकीचा खोळंबा निर्माण झाला. यापूर्वीही याच सरोवरातून अशा प्रकारची रासायनिक क्रिया झाली होती.  
बातम्या आणखी आहेत...