आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेन्नई : पुरातील मृतांची संख्या पोहोचली ३४७ वर, मदत कार्य सुरूच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - तामिळनाडूतील पुरातील मृतांची संख्या ३४७ वर पोहोचली आहे. १ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या नैसर्गिक संकटाचा फटका १७.६४ लाख नागरिकांना बसला आहे. राज्यभरात पूरग्रस्तांसाठी ६६०५ तात्पुरत्या निवाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी आतापर्यंत ६७. ४७ कोटी रुपयांचे अन्न साहित्याचे वितरण करण्यात आले आहे. त्याचा लाभ १.११ लाख कुटुंबांना झाला आहे. लष्कराच्या १२ तुकड्या, एनडीआरएफच्या ४८, नौदल आणि तटरक्षक दलाच्या ४०० जवानांसोबतच हवाई दलही पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या मदतीसाठी अहोरात्र प्रयत्न करत आहे. राज्यात पूर संकटामुळे सुमारे ८ हजार १४८ कोटी रुपयांची हानी झाली आहे, असा दावा मुख्यमंत्री जयललिता यांनी केला आहे.
तामिळनाडूतील जनतेला गेल्या अनेक दिवसांपासून गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. मोठ्या प्रमाणात मदतीचा आेघही सुरू आहे.