आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Chennai, Hyderabad, Chitradurga Reserves At 31 Million New Currency Notes Seized Banks Rattle, But It Equally To Agents

चेन्नई, हैदराबाद, चित्रदुर्ग येथे ३१ कोटींच्या नव्या नोटांचे साठे जप्त बँकांत नोटांचा खडखडाट, दलालांकडे मात्र सुळसुळाट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई/बंगळुरू : नोटबंदीच्या निर्णयानंतर देशभरातील बँका व एटीएममध्ये नव्या नोटांचा तुटवडा जाणवत असताना बाहेर मात्र या नव्या चलनी नोटांचे कित्येक कोटी किमतीचे साठे जप्त केले जात आहेत. शनिवारी एकाच दिवशी देशभरात विविध ठिकाणी टाकण्यात आलेल्या धाडींत एकूण ३१.०६ काेटी रुपयांच्या नव्या नोटा जप्त करण्यात आल्या.
तामिळनाडूतील वेल्लोरमध्ये २४ कोटी, कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यात रोख ५.७ कोटी, हैदराबादेत ७१ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. अन्य एका कारवाईमध्ये हैदराबादेतच एका पोस्टाच्या अधिकाऱ्याकडून ६५ लाख रुपयांच्या नव्या चलनी नोटा जप्त करण्यात आल्या.

सामान्यांना आपल्या खात्यातून शे-पाचशे काढण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. बँकांत पुरेशा नव्या नोटाच नसल्याने अर्ध्यातच रांग थांबते आणि सामान्य माणसाला दुसऱ्या दिवशीपर्यंत वाट पहावी लागते. बँकांत ही स्थिती असताना बाहेर मात्र नव्या नोटांचे साठे पकडले जात असल्याने या नोटा बाहेर येतात कशा आणि संबंधितांना मिळतातच कशा, हा प्रश्न सामान्यांना पडला आहे.

ठेकेदार रेड्डीची कसून चौकशी
खाण उद्योगातील ठेकेदार एस. रेड्डी याने या सर्व नोटा व सोने आपल्या मालकीचे असल्याचा दावा केला असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. विशेष म्हणजे २ हजार रुपयांच्या बँकांत नोटांचा खडखडाट, दलालांकडे मात्र सुळसुळाट नोटांची बंडले असली तरी त्यावर कोणत्याही बँकांची पावती लावण्यात आलेली नाही. या सुट्या नोटांचा एवढा साठा आला कुठून हा प्रश्न प्राप्तीकर विभागाला पडला आहे.
............................
कर्नाटकात ५.७ कोटी रुपये जप्त
चित्रदुर्ग जिल्ह्यात चल्लाकेरे शहरामध्ये प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी टाकलेल्या एका धाडीत ५.७ कोटी रुपये जप्त करण्यात आले. ही रक्कम पण नव्या दोन हजारांच्या नोटांच्या स्वरूपात ठेवलेली होती. पोलिस गुप्तचरांनी दिलेल्या माहितीच्या आधारे प्राप्तीकर विभगाच्या अधिकाऱ्यांनी गोडतेलाच्या उत्पादनाचे भांडार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागातील एका घरावर छापा टाकला. तेव्हा वाॅश बेसिनच्या वर एका कपाटात या नोटांची बंडले ठेवलेली आढळली.

कोथूरमध्ये ७१ लाख जप्त
हैदराबादनजीक कोथूर येथे शुक्रवारी रात्री पोलिसांनी वाहनांची तपासणी करत असताना ८२ लाख रुपयांच्या नोटा जप्त केल्या. यात ७१ लाख रुपये नव्या २ हजारच्या नोटांच्या स्वरूपात होते. या प्रकरणात दोन दलालांना अटक करण्यात आली आहे. जुन्या नोटा बदलून नव्या नोटा देणाऱ्या या दलालांनी कमिशनच्या स्वरूपात ही रक्कम मिळवली असल्याचे पोलिस तपासात समोर येत आहे.
...................................
पोष्टाच्या अधिकाऱ्याकडे ६५ लाख
सीबीआयने हैदराबादेतील एका पोष्टातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून ६५ लाख रुपये जप्त केले. नव्या २ हजाराच्या नोटांच्या स्वरूपात ही रक्कम ठेवण्यात आली होती. सीबीआय अधिकाऱ्यांनी या प्रकरणी के. सुधीरबाबू यास ताब्यात घेतले असून सुमारे पावणेचार कोटी रुपयांच्या जुन्या नोटा बदलून देण्याची दलाली म्हणून सुधीर यास ही रक्कम मिळाली होती, अशी माहिती चौकशीत समोर येत आहे.
वेल्लोरमध्ये २४ कोटींच्या नोटा जप्त
प्राप्तिकर विभागाने शनिवारी वेल्लोरमध्ये २४ कोटी रुपये किमतीच्या नव्या नोटांचा साठा पकडला. ५०० व १ हजारच्या जुन्या नोटा बंद झाल्यानंतर नव्या नोटांचा जप्त केलेला हा सर्वांत मोठा साठा आहे. चेन्नईमध्ये गेल्या दोन दिवसांत प्राप्तीकर विभागाने खाण उद्योगातील एका कंपनीशी संबंधित आठ ठिकाणी धाडी टाकून सुमारे १४२ कोटी रुपयांची बेहिशेबी संपत्ती जप्त केली आहे.

यात १० कोटी रुपयांच्या नव्या चलनी नोटा व १२७ किलो सोन्याच्या बिस्किटांचा समावेश आहे. यात तब्बल ९६.८९ कोटी रुपये किमतीच्या जुन्या नोटांचा साठाही सापडला आहे. अजूनही हे धाडसत्र थांबलेले नाही.
बातम्या आणखी आहेत...