आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chetan Bhagat Launch His New Book ‘Half Girlfriend’

Half Girlfriend : चेतन भगतची नॉव्हेल एकता कपूरच्या हस्ते होणार लाँच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : फ्लिपकार्टचे सिनिअर व्हाइट प्रेसिडेंट कल्याण कृष्णमूर्ति यांच्याबरोबर फ्लिपकार्टच्या वेअरहाऊसमध्ये चेतन भगत.

नवी दिल्ली - प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांचे बहुचर्चित पुस्तक किताब 'हाफ गर्लफ्रेंड' आज औपचारिकरित्या लाँच केले जाणार आहे. मुंबईत इनफिनिटी मॉलमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. चेतन गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या या पुस्तकाचे प्रमोशन करण्यात व्यस्त होते. त्यांच्या प्रत्येक पुस्तकानंतर ट्वीटरवर त्यांच्या फॉलोअर्सच्या संख्येत वाढ होत असल्याचे त्यांनी ट्वीटद्वारे सांगितले.
एक ऑक्टोबरलाच फ्लिपकार्टद्वारे या पुस्तकाची डिलेव्हरी सुरू करण्यात आली आहे. 'हाफ गर्लफ्रेंड' माधव नावाचा बिहारी मुलगा आणि रिया नावाच्या शहरी मुलीमधील एकतर्फी लवस्टोरीच्या संदर्भातील गोष्ट आहे. चेतन भगत यांनी हे पुस्तक लिहायला सुरुवात केली तेव्हापासून ते चर्चेत आहे.
पुस्तकावर चित्रपट बनवणार एकता
'हाफ गर्लफ्रेंड' पुस्तकाच्या लाँचदरम्यान निर्माता-दिग्दर्शक एकता कपूर आणि दिग्दर्शक मोहीत सुरीही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या पुस्तकावर बालाजीच्या बॅनरखाली चित्रपट बनणार असल्याचा अंदाज लावला जात आहे. मोहीत पुढच्या वर्षी भट्ट कँपचा 'हमारी अधूरी कहानी' पूर्ण झाल्यानंतर या चित्रपटावर काम सुरू करणार असल्याचे सांगितले जात आहे. चित्रपटात कृति सेननची मुख्य भूमिका राहणार असल्याचे सांगितले जात आहे. हुमा कुरेशी आणि आलिया भट्ट यांच्या नावाचीही चर्चा होती. पण कृती स्वतः चेतन भगला पुस्तक परत देण्यासाठी गेली त्यावेळी या वृत्ताला दुजोरा मिळाला. कृती पुस्तकाच्या लाँचींगलाही उपस्थित राहणार असल्याचे समजते आहे. चेतन भगत यांनी या पुस्तकावर चित्रपट बनवणार असल्याचे आधीच स्पष्ट केले होते. चेतनच्या पुस्तकांवर आतापर्यंत वन नाइट अ‍ॅट कॉल सेंटर, 3 इडियट्स, काय-पो-चे, 2 स्टे्ट्स हे चित्रपट तयार झाले असून, हे सर्व सुपरहिट चित्रपट आहेत.

4 क्रमांकाची प्रतीक्षा
चेतन भगतच्या पुस्तकांचे आतापर्यंत जेवढे टायटल आले आहेत, त्यात एखादा तरी आकडा असतो. '5 पॉइंट समवन', '3 मिस्टेक्स ऑफ माय लाइफ', '2 स्टेट्स' आणि '1 नाइट अ‍ॅट कॉल सेंटर' नंतर आता 'हाफ गर्लफ्रेंड' येत आहे. विशेष म्हणजे 4 क्रमांकाचा वापर असलेल्या नावाने अद्याप त्यांचे पुस्तक आलेले नाही.

पुस्तक मिळणा-यांनी ट्वीटरवर केला पोस्टचा मारा
फ्लिपकार्टने पुस्तकाची डिलेव्हरी सुरू केली आहे. लोकांनी ट्वीटरवर पुस्तकाच्या प्री बुकींगचे छायाचित्र प्रसिद्ध केल्यास त्यांना एक गिफ्ट देणार असल्याचे चेतन भगत म्हणाले होते. पण काय देणार हे मात्र त्याने जाहीर केलेले नाही. त्यामुळे त्यांच्याकडे पोस्टचा मारा होत आहे. तसेच अनेक प्रकारे चेतन ऑनलाइन प्रमोशन करत आहेत. चेतन यांनी फेसबूकवरही पुस्तकाचे प्रमोशन सुरू केले आहे.

फेसबूकवर चेतनने केलेले पोस्ट
“You write. You sell. And finally the day arrives when the hype ends and word of mouth takes over. And then it is out of your hands and in the hands of the people. It is that moment of letting go that is the most scary, and yet the most liberating. It is a near spiritual experience of working on something for years and then putting it out there for others to decide its fate. It happens to artists, it happens to parents and while difficult, it is necessary and completes the circle of life. Half Girlfriend, take care of yourself. Daddy could only bring you up to here”

हाफ गर्लफ्रेंडचे लाँच व चेतन भगतची छायाचित्रे पाहा पुढील स्लाइड्सवर...