आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्घटना टळली : दिल्ली डेअर डेव्हिल्सच्या विमानासमोर आले दुसरे विमान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर - आयपीएल-8 चा सामना खेळण्यासाठी रायपूरला पोहोचत असलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्स टीमसोबत शुक्रवारी मोठी दुर्घटना होता- होता टळली आहे. जेव्हा त्यांचे विमान रनवेवर लँड झाले होते तेव्हाच दुसरे विमान तिथे आले, मात्र वैमानिकाच्या समयसुचकतेने मोठा अपघात टळला आहे.
दिल्ली डेअर डेव्हिल्स टीम शुक्रवारी सकाळी इंडिगो फ्लाइटने स्वामी विवेकानंद विमानतळावर पोहोचले. फ्लाइट निर्धारित वेळेपेक्षा काही वेळ उशिरा पोहोचले होते. प्रवाशी फ्लाइटमधून बाहेर पडत असताना त्याचे वेळी मुंबई - रायपूर जेट एयरवेजचे विमान त्याच्या नियमीत वेळेवर (8.40 a.m.) विमानतळावर दाखल झाले. जेट विमानालाही त्याच रनवेवर लँड करण्यात आले जिथे इंडिगो फ्लाइट उभे होते. जेटच्या वैमानिकाने समयसुचकता दाखवत विमानाचा वेग कमी केला आणि त्याला वेळीच आलीकडे थांबवले. यामुळे मोठी दर्घटना टळली आहे. यावेळी दोन्ही विमानांमध्ये प्रवाशी होते. या घटनेनंतर दोन्ही विमानातील प्रवाशांना मोठा धक्का बसला त्यातून सावरायला त्यांना बराच वेळ लागला आहे. इंडिगो विमानातून दिल्लीचे क्रिकेटर्स सुरक्षीत बाहेर पडले आणि हॉटेल केन्यॉयकडे रवाना झाले.
बातम्या आणखी आहेत...