आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्तीसगडमधील ‘भास्कर’ चे "नो पॉलिथिन' अभियान देशात आदर्श

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर- छत्तीसगडमध्ये दैनिक भास्करने सुरू केलेल्या "नो पॉलिथिन' अभियानाला मोठे यश मिळाले आहे. छत्तीसगड सरकारने राज्यात पॉलिथिनवर संपूर्ण बंदी लागू केली आहे. राष्ट्रीय हरित लवादानेही (एनजीटी) छत्तीसगडमध्ये पॉलिथिनवर लादलेल्या बंदीचे काम आदर्श ठरवले आहे. लवाद छत्तीसगडला देशात आदर्श राज्याच्या रूपात सादर करेल.
शहर विकासमंत्री अमर अग्रवाल यांनी मंगळवारी विभागीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत सांगितले की, एनजीटीने छत्तीसगडमधील कामांची प्रशंसा केली आहे. राज्य सरकारने दैनिक भास्करने चालवलेल्या अभियानाची विस्तृत माहिती दिली. ‘भास्कर’ने केवळ वृत्तपत्रात बातम्या देऊन मोहीम राबवली नाही, तर शाळांमध्ये २० लाखांहून जास्त मुलांना पॉलिथिनचा वापर न करण्याची शपथ दिली. राष्ट्रीय हरित लवादाने पॉलिथिन वापर रोखण्यासाठी राज्यात सुरू असलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. अन्य राज्यांच्या तुलनेत छत्तीसगडमध्ये चांगले काम झाल्याचा गौरव त्यांनी केला. राज्यात कुठेही पॉलिथिनचा वापर होऊ नये. तसे आढळल्यास कडक कारवाईही करावी, असे निर्देश शहर विकासमंत्र्यांनी
अधिकाऱ्यांना दिले.
बातम्या आणखी आहेत...