आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्तीसगड हल्ल्यातील 3 नक्षली जेरबंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर- छत्तीसगड येथे मे 2013 मधील जिराम खोरे हत्याकांड प्रकरणात सहभागी असलेल्या एका वरिष्ठ कमांडरसह तीन नक्षलवाद्यांना छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात बुधवारी रात्री अटक करण्यात आली.
बिजापूर जिल्हा पोलिस उपअधीक्षक सुखनंदन राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, पथकाने संशयावरून पश्चिम बस्तर विभागात कार्यरत नक्षलवादी लष्करी कंपनीचा शाखा कमांडर चैतू लेकाम ऊर्फ मुन्ना (27), प्लाटून कमांडर आयतू पुनेम (37) आणि त्यांचा सहकारी मंगू कुंजम (24) या तिघांना अटक केली. हे तिघे आठवडी बाजारासाठी आले होते. जिराम खोरे हल्ल्याची चौकशी करणार्‍या राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) या तिघांच्या अटकेची माहिती देण्यात आली आहे.
जिराम हल्ला प्रकरण
25 मे 2013 रोजी काँग्रेसच्या परिवर्तन रॅलीतील वाहनांवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला होता. यात छत्तीसगड प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नंदकुमार पटेल, त्यांचा मुलगा दिनेश, माजी केंद्रीय मंत्री विद्याचरण शुक्ला, विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेता महेंद्र कर्मा यांच्यासह 31 जण ठार झाले होते.