आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नी ऐवजी मेव्हणीला परीक्षेला बसवणार्‍या शिक्षणमंत्र्यांनी स्वतःला केले घरात कैद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर - छत्तीसगड सरकारमधील एक मंत्री पत्नीमुळे वादात अडकले आहेत. विरोधकांनी मंत्री महोदयांविरुद्ध मोर्चा उघडल्यामुळे त्यांनी स्वतःला सरकारी निवासस्थानात कैद करुन घेतले आहे.

मुख्यमंत्री डॉ. रमणसिंह यांच्या सरकारमधील शिक्षणमंत्री केदार कश्यप यांनी त्यांच्या पत्नीऐवजी दुसऱ्याच स्त्रीला परीक्षेला बसवले होते. परीक्षेत डमी उमेदवार बसवल्यामुळे वादात अडकलेल्या कश्यप यांच्याविरुद्ध काँग्रेसने जोरदार आंदोलन सुरु केले आहे. शुक्रवारी कश्यप यांचा राजीनामा आणि त्यांच्या पत्नीच्या अटकेची मागणी करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी बस्तरमध्ये धरणे आंदोलन केले. हा कश्यप यांचा बालेकिल्ला मानला जातो.
डॉ. रमणसिंहांनी शिक्षणमंत्र्यांना क्लिनचीट दिली असली तरी, विरोधकांच्या आंदोलनाला धार चढली आहे. त्यामुळे दबावात आलेल्या केदार कश्यप यांनी 5 ऑगस्टपासून सार्वजनिक कार्यक्रमात जाणे, सरकारी कामानिमीत्त बाहेर जाणे बंद केले आहे. त्यांनी स्वतःला शासकीय निवासस्थानात कैद करुन घेतले आहे. रायपूरमधील निवासस्थानी ते त्यांनी बोलावलेल्या लोकांनाच फक्त भेटत आहेत.

काय आहे वाद
5 ऑगस्ट रोजी सुंदरलाल शर्मा ओपन युनिव्हर्सिटीच्या बस्तरच्या लोहांडीगुडा परीक्षा केंद्रावर एमए इंग्रजी विषयाची परीक्षा झाली. मंत्री केदार कश्यप यांची पत्नी शांती कश्यप यांच्या ऐवजी या परीक्षेला त्यांची जवळची नातेवाईक परीक्षा देताना आढळून आली होती.
बातम्या आणखी आहेत...