आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chhattisgarh Naxal Attack News In Marath, Home Minister Sudhilkumar Shinde

नक्षलवादी हल्ल्याचा सूड उगवणार : गृहमंत्री

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगदालपूर- सुकमा जिल्ह्यातील नक्षलवादी हल्ल्याचा सूड उगवणार असल्याची ग्वाही केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली. मंगळवारी सुकमा जिल्ह्यातील नक्षली हल्ल्यात एक नागरिक आणि 15 जवान शहीद झाले. या हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास संस्था करणार असल्याचे सांगून लोकसभा निवडणूक उधळण्यासाठीच हा हल्ला झाला असल्याची शक्यताही गृहमंत्र्यांनी व्यक्त केली.

नक्षली हल्ल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री छत्तीसगडमध्ये दाखल झाले आहेत. या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे 11, छत्तीसगड पोलिसांचे 4 जवान शहीद झाले. राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) मार्फत या हल्ल्याचा तपास केला जाईल, असे सांगून नक्षलवाद्यांचे अड्डे आम्हाला माहिती आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या सुरक्षा दलांची संयुक्त मोहीम हाती घेण्यात येईल. हल्ल्यात सहभागी माओवाद्यांना शोधून बदला घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

विधानसभेप्रमाणेच खबरदारी घेणार
येत्या 7 एप्रिलपासून लोकसभा निवडणूकीचे मतदान सुरु होत आहे.हे पाहता निवडणूकीत गडबड करण्याचा हा प्रयत्न आहे परंतु छत्तीसगड विधानसभेप्रमाणेच या निवडणूकाही सुरुळीतपणे पार पाडण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जाईल असे त्यांनी सांगितले.