आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chhattisgarh Student Arrested News In Divya Marathi

फोनवर एटीएम, पिन नंबर विचारून फसवणारी विद्यार्थ्यांची गँग अटकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर - छत्तीसगड पोलिसांनी देशातील अनेक बड्या शहरांत फसवणूक करणार्‍या आठवी-दहावीच्या विद्यार्थ्यांच्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. इंटरनेटवरून शोधून काढलेल्या मोबाइल क्रमांकावर फोन करून एटीएम क्रमांक व पिन नंबर विचारून त्या बँक खात्यातील शिल्लक रक्कम काढून घेण्याचा कारनामा ही टोळी करत होती. महाराष्ट्रातील अनेक शहरांसह इतर चार - पाच राज्यांतील बड्या शहरांत या ‘विद्यार्थी गँग’ने हातसफाई केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपीस झारखंडमधील जामताडा जिल्ह्यातील दुधनी येथून पकडण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याचे नाव जगदीश मंडल असे असून तो कॉलेजचा विद्यार्थी आहे. मात्र, त्याचे इतर सहकारी मात्र फरार आहेत. या गँगचे सदस्य नेटवरून मोबाइल क्रमांक मिळवत असत. त्यावर फोन करून आम्ही बँकेतून बोलत आहोत, तुमच्या एटीएम कार्डचे नूतनीकरण किंवा अपडेट करायचे आहे, असे सांगून पासवर्डही जाणून घेत असत. तीन महिन्यांत या गँगने छत्तीसगडमध्ये 50 पेक्षा जास्त बँक ग्राहकांना फसवल्याचे स्पष्ट झाले आहे.

विद्यार्थ्यांना दिले ट्रेनिंग
रॅकेटमध्ये सहभागी करण्याआधी फोनवर लोकांना जाळ्यात कसे ओढायचे याचे प्रशिक्षण दिले जात असे. त्यांना सामान्य हिंदी बोलण्याचे प्रशिक्षण दिले जात असे. फसवणूक संपूर्ण यशस्वी झाल्यास मिळणार्‍या रकमेवर कमीशन दिले जात असे.