आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: लाइव्ह बुलेटीनमध्ये अँकरने वाचली पतीच्या मृत्यूची बातमी; एक वर्षापूर्वी झाले होते लग्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पतीच्या मृत्यूची बातमी वाचताना चॅनलची अँकर सुप्रीत कौर. - Divya Marathi
पतीच्या मृत्यूची बातमी वाचताना चॅनलची अँकर सुप्रीत कौर.
रायपूर- सुप्रीत कौर छत्तीसगडमधील एका वाहिनीवर अँकर आहे. शनिवारी सकाळी ती स्टुडिओत आली. ‘मॉर्निंग न्यूज’मध्ये  बातम्या देण्यास सुरुवात केली. इतक्यात महासमुंदहून एनएच-३५३वर पिथोराजवळ कार अपघात झाल्याची बातमी आली. यात ५ पैकी तिघांचा जागीच मृत्यू झाला. दोघे गंभीर जखमी झाले. 

सुप्रीत कौर या अपघाताचे लाइव्ह कव्हरेज देऊ लागली. स्थानिक बातमीदाराकडून फोनवर ती माहिती घेत होती. रायपूरला परतत असताना हा अपघात झाल्याचे बातमीदाराने सांगितले. तेव्हा सुप्रीतला यत्किंचितही कल्पना नव्हती की जी बातमी ती देत आहे त्या मृतांत तिच्या पतीचा समावेश आहे. तिला तेवढ्यात आठवले की, याच मार्गावर तिचा पती चार सहकाऱ्यांसोबत सराइपालीस गेला होता. आता तिचा धीर सुटत चालला होता. तरी ती थांबली नाही... ही बातमी ती सांगत राहिली. तोवर मृतांची ओळख पटलेली नव्हती. कारचे छायाचित्र पाहिल्यावर तिला आता शंका येऊ लागली. कारण तिच्या पतीची कार अगदी तशीच होती. काही वेळानंतर बातम्या संपल्या. सुप्रीत स्टुडिओबाहेर पडली आणि ओक्साबोक्शी रडू लागली. पतीला तिने मोबाइलवर कॉल केला. तो उचलला गेला नाही. घरच्यांना तिने ही माहिती दिली. काही वेळानंतर तिची शंका खरी ठरली होती. कारण, मृतांमध्ये तिचे पती हर्षद कवाडे यांचाही समावेश होता.
 
एक वर्षापूर्वी झाला होता विवाह
सुप्रीत भिलाईची रहिवासी आहे. एक वर्षापूर्वी हर्षद कवाडेशी तिचा विवाह झाला होता. कित्येक वर्षांपासून ती स्थानिक चॅनलवर काम करत होती. तिच्या सहकाऱ्यांनुसार, सुप्रीत बातम्या वाचत होती तेव्हाच त्यांना मृतांमध्ये तिच्या पतीचा समावेश असल्याचे कळले होते. मात्र, हे सत्य तिला सांगण्याचे त्या वेळी कुणाचेही धाडस झाले नाही. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...