आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमच्या भीतीनेच पोलिसांच्या ताब्यात गेला छोटा राजन, डी कंपनीच्या शकीलचा दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2000 मध्ये बँकॉकमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर हॉस्पिटलमधील छोटा राजनचा फोटो - Divya Marathi
2000 मध्ये बँकॉकमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर हॉस्पिटलमधील छोटा राजनचा फोटो
मुंबई/ बँकॉक - इंडोनेशियाच्या बाली येथून अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला सोमवारी अटक करण्यात आले आहे. त्यानंतर अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहे. त्यात राजनचा क्रमांक एकचा शत्रू दाऊद इब्राहिमचा राइट हँड छोटा शकीलने दावा केला आहे की माझ्यामुळेच त्याला अटक झाली आहे. त्याने स्पष्ट केले आहे, की राजनचे अटकेने आनंद झालेला नाही. त्याला संपल्या शिवाय मी राहाणार नाही. दुसरीकडे एका इंग्रजी दैनिकाने म्हटले आहे, की राजनला त्याच्याच गँगने धोका दिला त्यामुळे त्याला पकडण्यात आले आहे.
दोन वेळा वाचला होता राजन
छोटा शकीलने 2000 मध्ये छोटा राजनवर बँकॉकमध्ये हल्ला केला होता. यात राजन गंभीर जखमी झाला होता. त्याच अवस्थेत तो हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यात यशस्वी झाला होता. त्यानंतर यावर्षी जुलैमध्ये शकीलने पुन्हा एकदा राजनवर हल्ल्याचा प्रयत्न केला होता, मात्र तेव्हा त्याला 'खबर' मिळाल्यामुळे पळून जाण्यात तो यशस्वी झाला.

काय म्हणाला छोटा शकील
राजनच्या अटकेवर एका इंग्रजी दैनिकासोबत केलेल्या संभाषणात छोटा शकील म्हणाला, 'माझ्या पंटरनी गेल्या आठवड्यात फिजीमध्ये त्याचा ठिकाणा शोधून काढला होता. त्यामुळे त्रस्त होऊन तो इंडोनेशियात पळून गेला. आमच्यामुळेच त्याला अटक झाली आहे. पण त्याच्या अटकेचा डी कंपनीला आनंद नाही. मी त्याला मारल्याशिवाय राहाणार नाही. जोपर्यंत हे काम होत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही.'

भारत सरकारवर विश्वास नाही - शकील
शकील म्हणाला, "आमचा भारत सरकारवर विश्वास नाही. त्यांनी राजनला कायम आमच्याविरोधात वापरले आहे. त्यामुळे त्याला भारतात नेले किंवा इंडोनेशियात सोडले त्याने काहीही फरक पडत नाही. त्याच्यावर खटला चालवला जाईल आणि त्याला शिक्षा होईल यावर आमचा विश्वास नाही. त्याच्या अटकेशी आम्हाला देणे-घेणे नाही. आमचा फंडा क्लिअर आहे, शत्रू संपला पाहिजे. मी त्याला सोडणार नाही, मग तो कुठेही असला तरी."

जवळच्यांनी धोका दिला का ?
काही माध्यमांमध्ये राजनला त्याच्याच गँगच्या सदस्यांनी धोका दिल्याचे म्हटले आहे. या लोकांनी छोटा शकील आणि दाऊदशी हात मिळवणी करुन त्याच्या विरोधात षडयंत्र रचले आणि छोटा राजन त्यात अडकला. सूत्रांच्या माहितीनूसार, राजनच्या कुकने डी कंपनीला त्याचे फोटो आणि डिटेल्स पुरवले. जुलैमध्ये त्याच्यावर झालेल्या हल्ल्यालाही त्याच्याच गँगचे लोक कारणीभूत होते. त्याला धोका देणाऱे तीन जण आहेत. त्यात दोघे भाऊ आहेत - रवी आणि विमल रात्तेसर. तिसरा त्याचा कुक मितवा आहे. रवी आणि विमल हवाला व्यवहार करतात.
कहाणी पुरी फिल्मी है...
सूत्रांच्या माहितीनूसार, रवी आणि विमल दोघेही मुंबईत राहातात. या दोघा भावांना दुबईत हॉटेल सुरु करायची इच्छा होती. त्यांनी छोटा शकीलसोबत हात मिळवणी केली. शकीलने राजनच्या बदल्यात मदतीचे आश्वासन दिले. त्या लालसेनेच त्यांनी राजनची माहिती लिक केली. शकीलने ही माहिती मितवाकडून कन्फर्म करुन घेतली. मितवाने शकीलला सांगितले होते की राजन दर आठवड्याला एक कॅफेत नियमीत जातो. जुलै मध्ये राजनवर झालेला हल्ला, हा याच षडयंत्राचा भाग होता. सूत्रांच्या माहितीनूसार हा हल्ला शकीलचा खास माणूस बाला शेट्टीने केला होता. रवी, विमल आणि मितवाने राजनचे लेटेस्ट फोटो शकीलला स्काइपच्या माध्यमातून पाठवले होते. रवी आणि विमल आता कुठे आहे, याची माहिती नाही मात्र विमल शेवटचा आयर्लंडमध्ये दिसला होता. सूत्रांची माहिती आहे, की राजनच्या गँगचे लोक त्याच्यावर नाराज होते. अनेक मोठ्या कामाचा त्यांना पाहिजे तेवढा मोबदला मिळालेला नव्हता.

'जयहिंद गँग'मध्ये का पडली फूट
छोटा राजन गँगचे लोक एकमेकांना भेटल्यानंतर जयहिंद म्हणतात, अशी माहिती आहे. त्यामुळे त्याच्या गँगला जयहिंद गँग देखिल म्हटले जाते. पण हे फार कमी लोकांना माहित आहे. पैसा हा राजनचा विक पॉइंट आहे. तो कधीही एका कामाचे पूर्ण पेमेंट करत नाही. त्यामुळेच त्याच्या गँगमध्ये फूट पडल्याचे बोलले जाते.

शरद शेट्टीला रवी-विमलनेच मारले होते
बँकॉकमध्ये 2000 मध्ये छोटा राजनवर जीवघेणा हल्ला झाला होता तो शरद शेट्टीच्या फ्लॅटमध्ये. शेट्टी म्हणायला राजनचा होता मात्र त्याने छोटा शकीलसोबत हातमिळवणी केली होती. या हल्ल्यानंतर राजनने शरद शेट्टीला संपवण्याचे ठरवले. रवी आणि विमल यांनीच शरद शेट्टीला मारले होते.

पुढील स्लाइडमध्ये, डॉनने स्वतःहून अटक करुन घेतली का