आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिर्याणीमुळे मोडले लग्न; चिकन की मटण यावरून वर्‍हाड्यांमध्ये जुंपली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू- बिर्याणी म्हटले की खवय्यांसाठी पर्वणीच असते. तोंडाला पाणी सोडणार्‍या लज्जतदार बिर्याणीमुळे निर्माण होणार्‍या स्नेहाबरोबरच उत्साहातही भर पडत असते आणि कधी कधी असा अतिउत्साह अडचणीचाही ठरू शकतो.
बंगळुरूमधील एका लग्नात नुकताच याचा प्रत्यय आला. लग्नातील मेजवानीमध्ये कोणती बिर्याणी असावी यावरून वधू आणि वर पक्षांमध्ये एकमत झाले नाही. वधू पक्षाला पाहिजे होती चिकन बिर्याणी तर वर पक्ष मटण बिर्याणीवर अडून बसले आणि त्याचे पर्यवसान अखेर मंडपातच लग्न मोडण्यात झाले.

ही एकंदर घटना मोठी गमतीची आहे. लग्नापूर्वी वधू पक्षाकडून 30 किलो चिकन बिर्याणी तयार करून वर पक्षाकडे पाठवली आणि तिथूनच या ‘द्वंद्व’ युद्धाला सुरुवात झाली. नवरदेवाचे कुटुंबीय चिकन बिर्याणी खात नाहीत, त्यांना ती आवडतही नाही त्यामुळे ते नाखुश झाले होते. त्यावर वधू पक्षाकडून त्यांची समजूत काढण्यात आली. लग्न समारंभामध्ये रविवारी सायंकाळी पुन्हा बिर्याणीचा मुद्दा उपस्थित झाला. बिर्याणीच्या किरकोळ कारणावरून सुरू झालेली ही कुरबुर पाहून नवरी मुलगी चिडली व तिने चक्क लग्नालाच नकार दिला.