आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
तिरुवनंतपुरम - सोलार पॅनल घोटाळ्यात मुख्यमंत्री ओमन चंडी यांच्या राजीनाम्याची मागणी करत माकपप्रणीत एलडीएफने बुधवारी पुकारलेल्या राज्यव्यापी बंदमुळे जनजीवन विस्कळीत झाले. बंददरम्यान कन्नूर येथील कॉँग्रेस व काझकुतम येथे आमदार एम. ए. वहिद यांच्या कार्यालयावर आंदोलकांनी दगडफेक केली.
कोझीकोडे येथे कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या बसवर दगडफेक करण्यात आली. काही ठिकाणी खासगी वाहनांवरही दगडफेक करण्यात आल्याचे वृत्त आहे. दिवसभरात संपूर्ण घटनेत कोणालाही गंभीर इजा झाली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.
काय आहे घोटाळा?
सरिता नायर व बिजू राधाकृष्णन या नागरिकांनी सोलार पॅनल सोल्युशन देण्याचे आमिष दाखवून अनेक लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणात चंडी यांच्या एका सहका-याचे आरोपीशी संबंध असल्याचे उघड झाल्यानंतर या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.