आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Child Abuse Case In Chhattisgarh News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनाथ आश्रमाची अधीक्षिका करत होती गरीब मुलींचा सौदा, ऐका Audio

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर/रायगड- छत्तीसगडमधील रायगड जिल्ह्यातील एका अनाथ आश्रमात सुरु असलेला गोरखधंदा चव्हाट्यावर आला आहे. राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त चक्रधर बाल सदन अनाथालयाची अधीक्षिका प्रिया गुप्ता अनाथलायातील मुलींचा सौदा करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रिया गुप्ता अनाथालयातील मुलींचा सौदा करत असल्याचा एक ऑडिओ टेप समोर आला आला आहे. ऑडिओ टेपमध्ये प्रिया गुप्ता आणि एका दलालाचे संभाषण आहे.
ऑडिओ टेप बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा जस्सी फिलिप यांनी जिल्हा प्रशासनाकडे सोपवला आहे. अधीक्षिका प्रिया गुप्ताने मुलींची विक्री करण्‍यासाठी अनेक दलालांशी सौदा केल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हाधिकार्‍यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहे. अधीक्षिका प्रिया गुप्ता हिला तत्काळ निलंबित करण्‍यात आले आहे.

वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे अनाथआश्रम...
श्रीचक्रधर बाल सदनला सर्वोच्च राष्ट्रपती पुरस्काराने सम्मानित करण्यात आले आहे. तसेच यापूर्वी देखील चक्रधर बाल सदन वादाच्या भोवर्‍यात सापडले होते. आश्रमातील एका पदाधिकार्‍यावर लैंगिकशोषनाचा आरोप करण्‍यात वाला होता. अधिकार्‍यांच्या अत्याचाराला कंटाळून नऊ मुलींनी काही महिन्यांपूर्वी पलायन केले होते. त्यानंतर आश्रमाचा कारभार पाहाण्यासाठी प्रशासन नेमण्यात आले होते.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, संबंधित फोटो...