आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Child Beaten Up In A Govt Shelter Home In Bengaluru

13 वर्षांच्या मुलाला लोखंडी रॉडने मारहाण, शासकीय शेल्टर होमच्या व्यवस्थापकाला अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरु (कर्नाटक) - शासकीय शेल्टर होममध्ये 13 वर्षांच्या मुलाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मुलाला एवढ्या निर्दयपणे मारहाण करण्यात आली, की चार जणांनी त्याला पकडून ठेवले आणि पाचवा व्यक्ती रॉडने मारहाण करत होता.
मारहाणीत जखमी झालेल्या मुलाने सांगितले, 'मला बाथरुम साफ करण्यास सांगितले जात होते. भांडी घासावी लागत होती. याची बाहेर वाच्यता केली तर, तुझे अपहरण करु अशी धमकी दिली जात होती.'
या प्रकरणी बंगळुरु सेंट्रलचे डीसीपी संदीप पाटील यांनी एफआयआर दाखल केल्याची आणि शेल्टर होमचा व्यवस्थापक रमेश याला अटक केल्याचे सांगितले आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, 13 वर्षांच्या मुलाला कशा पद्धतीने झाली मारहाण