आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहसी आई: बालक विहिरीत पडले, मातेने वाचवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भिलाई - आई केवळ जन्मदात्रीच नसते, तर ती आपल्याला आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर नवनवीन रूपाने जीवन देणारी असते. म्हणूनच जग तिला पृथ्वीवरील ईश्वराचे रूप मानते. अशाच एका आईने आपला जीव धोक्यात घालून पोटच्या गोळ्याला नवजीवन प्रदान केले.
छत्तीसगडमधील जेवरा गावातील सावित्री निषाद (२२) या महिलेने आपल्या दीडवर्षीय गगन नामक बालकास विहिरीतून सुखरूप बाहेर काढले. घटना १५ जुलैची आहे. ही घटना कशी घडली, त्याची हकिकत सावित्रीच्याच शब्दांत....

मी विहिरीजवळ धुणे धूत होते. गगन खोडकर आहे. तो खेळत खेळत घरातून बाहेर जातो. म्हणून मी त्याला दोरीने झाडाला बांधून ठेवत असते. त्या दिवशीही मी तेच केले. गगन खेळत खेळत विहिरीजवळ आला. मी धुणे धुण्यात मग्न होते. अचानक मला विहिरीत काहीतरी पडल्याचा आवाज आला. तेवढ्यात अंगणात पाहिले असता गगन काही दिसला नाही. मी भेदरले. मग विहिरीत वाकून पाहिले. गगन बुडत होता. मला काय करावे हेच उमगत नव्हते. मी हादरले. आजूबाजूलाही कोणी नव्हते. काहीच सूचत नव्हते. त्याला वाचवण्यासाठी मी विहिरीत उडी मारली. तो बुडत होता. डोक्याला जखमही झाली होती. त्याची अवस्था पाहून काय करावे कळत नव्हते. मदतीसाठी आवाज दिला, परंतु माझा आवाज बहुदा लोकांपर्यंत पोहोचत नव्हता. तरीही हिंमत केली. हार मानली नाही. सातत्याने आवाज देत राहिले. मी थकून गेले होते. पोहता येत नसल्याने आेरडत राहिले. त्याच वेळी विहिरीत शेजारी दुर्गासिंह पटेल याचा आवाज कानावर पडला. तो विहिरीच्या वरच्या भागातून आम्हाला पाहत होता. तेव्हा जीव भांड्यात पडला. दुर्गा दोरीच्या साहाय्याने विहिरीत उतरला. आम्हाला आेढत होता. इकडून तिकडून कसेतरी बाहेर पडलो. ही बातमी समजल्यानंतर गावकरी तेथे पोहोचले. बाळाला खूप जखमा झाल्याने त्याला तत्काळ रुग्णालयात नेले.

पुरस्कारासाठी प्रयत्न
सावित्री आणि दुर्गा पटेल यांच्या साहसाबद्दल गावकरी त्यांची स्तुती करत आहेत. पोलिसांना याविषयीची माहिती मिळाल्यानंतर या गावी दाखल झाले. अशा साहसी कार्यासाठी सरकार पुरस्कृत करते. त्याची माहिती सरकारपर्यंत पोहाेचवली जाईल.
छायाचित्र: मुलगा गगनसह धाडसी सावित्री.